कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने रुग्ण फरार; पालिका कर्मचाऱ्यांच्या डोक्याला ताप
सोलापूरातील एका विचित्र घटनेची चर्चा शहरात सुरू आहे.
सोलापूर : राज्यात कोरोनाचा हाहाकार उडालेला असताना, नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण आहे. अशातच सोलापूरातील एका विचित्र घटनेची चर्चा शहरात सुरू आहे.
काल सोलापूरातील भाजी मंडईत नागरिकांची रॅपिड अँटीजन टेस्ट करण्यात येत होती. नागरिकांच्या सुरक्षितेसाठी महापालिकेने हा उपक्रम सुरू केला होता. त्याप्रमाणे पालिका कर्मचारी टेस्ट करीत होते.
रॅपिड अँटीजन टेस्टमध्ये 21 नागरिक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. परंतु या लोकांनी पुढील खबरदारी घेण्याएवजी तेथून पलायन केले. टेस्ट केलेल्या 21 पैकी 9 जणांनी तेथून पळ काढला.
पळून गेलेल्या रुग्णांपैकी 6 जणांचा शोध पालिकेने सायंकाळपर्यंत लावला होता. त्यातील एक जण स्वतःहून हजर झाला. अद्यापही 2 रुग्ण फरार आहेत.
फरार असलेल्या 2 रुग्णांचा शोध पालिका कर्मचारी करीत आहेत.