पुणे : 10 वी आणि 12 वी च्या उत्तीर्णतेच्या पात्रतेत कुठलाच बदल करण्यात आला नसल्याचं राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने स्पष्ट केलं आहे. यावर्षी उत्तीर्ण होण्यासाठी 35 ऐवजी 25 टक्के गुण पुरेशे ठरणार असल्याची चर्चा होती. पण ती केवळ अफवा आहे,. त्यावर कुणी विश्वास ठेवू नये असं मंडळातर्फे आवाहन करण्यात आलं आहे. (SSC-HSC Exam)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे दरम्यान तर बारावी बोर्डाची परीक्षा 23 एप्रिल ते 21 मे दरम्यान होणार आहे. पण दुसरीकडे राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असताना आता याबाबत पुढील दोन दिवसात बोर्डाकडून पुन्हा मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात येणार आहे. (Board exam)


दहावीची प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी परीक्षा 12 एप्रिल ते 28 एप्रिल 2021 दरम्यान होणार असून बारावीचे प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी परीक्षा 5 एप्रिल ते 22 एप्रिल 2021 दरम्यान होणार आहे. परीक्षा या लेखी पद्धतीनेच होणार आहे, असं या आधीच सरकारने स्पष्ट केलं आहे. पण आता कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि रोज वाढत जाणारी रुग्णसंख्य़ा यामुळे प्रशासन आणि बोर्ड काय निर्णय घेतो हे पाहावं लागेल. (10th and 12th exam)


सोशल मीडियवर दहावी आणि बारावी परीक्षांबाबत विविध अफवा पसरवल्या जात आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वान न ठेवण्याचं आवाहन बोर्डाने केलं आहे. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर सर्व माहिती दिली जाणार आहे.