Maharashtra SSC 10th Result 2023: आज दहावीचा निकाल; दुपारी 1 वाजता 10 वी रिझल्ट जाहीर होणार
Maharashtra SSC Result 2023 Date: बोर्डाच्या परीक्षा म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा. दहावी असो किंवा मग बारावी, बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण होऊन प्रत्येकजण स्वत:साठी करिअरच्या नव्या वाटा शोधताना दिसतं.
Maharashtra HSC Results 2023 Today: शालेय जीवनातील टप्पा ओलांडून महाविद्यालयीन आयुष्यात प्रवेश करु पाहणाऱ्या आणि इयत्ता दहावीच्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची. कारण, बातमी आहे, SSC परीक्षांच्या निकालांची. नुकतीच महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 2022 - 23 या शैक्षणिक वर्षासाठी बोर्डाची परीक्षा घेण्यात आली. या परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थांची सुट्टी सुरु झाली आणि सुट्टीला महिनाही पूर्ण होत नाही, तोच या परीक्षांच्या निकालांची माहिती समोर आली आहे. (ssc hsc exams 2023 result likely to be on 10 th june latest Marathi news)
यंदाच्या वर्षी इयत्ता दहावीसोबतच इयत्ता बारावीच्या परीक्षांचे निकाल निर्धारितक वेळेतच लागणार असल्याची माहिती मिळत आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठड्यात किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात बारावीचे निकाल लागतील. तर, 10 जूनपर्यंत इयत्ता दहावीचे निकाल लागणार असल्याचं म्हटलं जात आहे.
संपाचे निकालांवर परिणाम?
दरम्यान, प्रलंबित मागण्या आणि जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी सरकारी कर्मचारी आणि शिक्षण वर्ग, शिक्षकेतर वर्गानं काही दिवसांपूर्वी पुकारलेल्या संपाचे या निकालांवर काही परिणाम होणार का, याचीच चिंता विद्यार्थी आणि पालक वर्गाकडून व्यक्त करण्यात आली होती. पण, आता मात्र हे चित्र अधिक स्पष्ट झालं असून, य़ा 8 दिवसांच्या संपाचा विद्यार्थ्यांच्या निकालांवर परिणाम होणार नसून, उत्तर पत्रिका तपासणीसाठी अपेक्षेहून जास्त वेळ दवडला जाणार नसल्याचं स्पष्ट होत आहे. त्यामुळं मे महिना अखेर किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात बारावीचे आणि त्यामागोमागच इयत्ता दहावीचे निकाल लागणार आहेत.
हेसुद्धा वाचा : Covid 19 : राज्याची चिंता वाढली! कोरोनामुळे 3 जणांचा मृत्यू, टास्क फोर्सची बैठक कधी होणार?
शिक्षण मंडळाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार इयत्ता बारावीचे निकाल लागल्यानंतर आठवड्याभराच्या कालावधीत दहावीचेही निकाल लागतील. ज्यानंतर पुढील महाविद्यालयीन प्रवेश आणि पदवी प्रवेश प्रक्रिया कालांतरानं सुरु होतील. त्यामुळं कोणत्या क्षेत्रात पुढे जायचं आहे ते विद्यार्थांनी आतापासूनच ठरवल्याल पुढील प्रक्रिया सोप्या असतील. दरम्यान, निकालानंतर पुनर्तपासणीसाठीचे अर्ज आणि त्याबाबतची माहिती अद्याप शिक्षण मंडळाकडून देण्यात आलेली नाही.