Covid 19 : राज्याची चिंता वाढली! कोरोनामुळे 3 जणांचा मृत्यू, टास्क फोर्सची बैठक कधी होणार?

Maharashtra Coronavirus Update : राज्याचा चिंतेत भर पडली आहे. एककडी बदलत्या हवामानामुळे (Maharashtra weather) उन्हाळ्यात अवकाळी पावसाने नागरिक हैराण असताना. पुन्हा एकदा राज्यात कोरोनाने (Covid 19 news) डोकं वर काढलंय. काल राज्यात कोरोनामुळे 3 जणांचा मृत्यू झालाय.

Neha Bhoyar | Updated: Apr 3, 2023, 09:21 AM IST
Covid 19 : राज्याची चिंता वाढली! कोरोनामुळे 3 जणांचा मृत्यू, टास्क फोर्सची बैठक कधी होणार?  title=
Corona Virus In Maharashtra reports 562 covid 19 cases three deaths and When will the task force meet Coronavirus in Mumbai marathi news

Corona Virus In Maharashtra : एकीकडे हवामानातील बदलामुळे लहान मुलांपासून मोठ्या लोकांचा तब्येती खराब झाल्या आहेत. भर उन्हाळ्यात अवकाळी (Maharashtra weather) पावसामुळे अनेकांना घसा दुखणे, सर्दी खोकला आणि ताप आला आहे. अशातच पुन्हा एकदा राज्यात कोरोनाने (Coronavirus News) पाय पसरायला सुरुवात केली आहे. रविवारी राज्यात कोरोनामुळे 3 जणांचा मृत्यू झालाय. त्यामुळे राज्याची चिंता वाढली आहे. 

तर रविवारी दिवसभरात 562 नव्या रूग्णांची नोंद झालीय. सध्या राज्यात कोरोनाचे 3 हजार 488 हून अधिक अॅक्टीव्ह रूग्ण आहेत. देशपातळीवरही दिवसेंदिवस कोरोना रूग्णसंख्या वाढतच चाललीय. रविवारी देशात पावणेचार हजारांहून अधिक रूग्णांची नोंद झाली होती. महाराष्ट्र, केरळ, हरयाणा, दिल्ली, राजस्थान या राज्यात कोरोना वेगाने फैलावतोय.(Corona Virus In Maharashtra reports 562 covid 19 cases three deaths and When will the task force meet Coronavirus in Mumbai marathi news)

काय आहे मुंबईची परिस्थिती? (Coronavirus in Mumbai)

गेल्या काही दिवसात मुंबईत कोरोनाने डोकं वर काढलं आहे. मुंबई शहरात 172 कोविड -19 प्रकरणे नोंदवण्यात आली आहे. नशीबाने एकही व्यक्तीचा मृत्यू झालेला नाही. मुंबई महानगरपालिकेने खरबरदारी म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या तयारी सुरु केली आहे.  महानगरपालिकेने शहरातील दोन रुग्णालयांसह तीन ठिकाणी जम्बो कोरोना केंद्र तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. याशिवाय परदेशातून येणाऱ्यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. 

टास्क फोर्सची बैठक कधी होणार? 

एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढत असताना टास्क फोर्सची बैठक कधी होणार असा प्रश्न उपस्थित झालाय. टास्क फोर्ससोबत बैठक घेण्यास राज्य सरकारला मुहुर्त मिळालेला नाही. कोरोना वाढत असताना आरोग्य यंत्रणाही सतर्क झालीय. प्रतिबंधात्मक उपायही केले जात आहेत. 

केंद्रीय आरोग्य खात्यानेही सर्व राज्यांना मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत. टास्कफोर्स नियमित बैठका घेऊन सरकारला सूचनाही करत आहे. मात्र अजूनही सार्वजनिक आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी टास्कफोर्सबाबत अजून एकही बैठक घेतलेली नाही. तत्कालीन आरोग्यमंत्री वारंवार टास्कफोर्ससह बैठका घेत होते मात्र सध्या तसं चित्र दिसतं नाही आहे. 

महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्या 

पुणे  - 119
नागपूर - 33
नाशिक - 30
औरंगाबाद - 25
कोल्हापूर - 15
लातूर - 14 
अकोला - 9