ST बस डायरेक्ट रस्त्यात आडवी झाली; सातारा - पुणे बेंगलोर महामार्गावर भीषण अपघात
सातारा येथे भीषण अपघात झाला आहे. एसटी बसलेला झालेल्या अपघात अनेक प्रवासी जखमी झाले आहेत.
ST Bus Accident : सातारा जिल्ह्यात ST बस चा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एसटी बस पलटी होवून थेट रस्त्यात आडवी झाली आहे. महामार्गावर बस उलटून झालेल्या अपघात 17 प्रवासी जखमी झास्याची प्राथमिक समोर आली आहे. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. जखमींना तातडीने रुग्णालायत दाखल करण्यात आले आहे.
सातारा - पुणे बेंगलोर महामार्गावर झाला अपघात
सातारा - पुणे बेंगलोर महामार्गावर शिवडे गावच्या हद्दीत उत्तर मांड नदीच्या पुलावर हा अपघात झाला आहे. भरधाव वेगाने जाणारी एसटी बस पलटी होऊन हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात चालक आणि क्लिनर गंभीर जखमी झाला असून पंधरा ते वीस प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
पावसामुळे अपघात झाल्याची माहिती
अपघातग्रस्त बस विजापूर येथून सातारा येथे जात होती. या बसमधून सुमारे पंधरा ते वीस प्रवासी प्रवास करत होते. अचानक बस पलटी झाली. यामुळे बसमधील प्रवासी देखील जखमी झाले आहेत. अपघाताचे नेमके कारण समोर आलेले नाही. मात्र, पावसामुळे रस्ते निसरडे झाल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बस रस्त्यात आडवी झाल्याने या अपघातानंनतर महामार्गावरील वाहतूक काही काळ खोळंबली होती.
जळगावमध्ये ST बसला अपघात
छत्रपती संभाजीनगर कडून चोपडा कडे जाणाऱ्या एसटी बसला जळगाव जवळ असलेल्या ममुराबाद गाव जवळ अपघात झाला आहे. सुदैवाने या अपघातात सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती आहे. समोरून येणाऱ्या ट्रक आणि दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात एसटी चालकांनी रस्त्याखाली बस उतरवल्याने पावसामुळे रस्त्यावर चिखल होता. त्यामुळे बस रस्त्याच्या बाजूला असलेल्या चारीत पडली. या बस मध्ये 40 ते 50 प्रवासी हे प्रवास करत होते.
मायलेकाचा एकाच दिवशी मृत्यू
गोंदिया जिल्ह्यातील मोरगाव अर्जुनी तालुक्यातील कोरंभीटोला येथे घडलेल्या अपघातात मायलेकांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतक मोहन बांगरे हा आपल्या आईसह नातेवाईकांकडे जात असतांना कोरंभीटोला येथे भरधाव टिपर ने दुचाकीला धडक दिली. यात दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. मोहन बांगरे (वय 24 वर्षे) आणि पुष्पकला बांगरे (वय 55 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही भंडारा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. घटनेची नोंद मोरगाव अर्जुनी पोलिसांनी घेतली आहे.