मुंबई : ST bus strike : परिवहन मंत्र्यांच्या इशाऱ्यानंतर कोल्हापुरात संप स्थगित करण्यात आला आहे. तर काही ठिकाणी खासगी वाहन चालकांकडून बससेवा सुरु आहे. काही ठिकाणी अद्याप विलीनीकरणाच्या मुद्द्यावर संप कायम आहे. पुणे येथे संप सुरुच आहे. नाशिकमध्ये एसटी वाहतूक सुरळीत झालीआहे. (ST employees agitation: Strike starts in Pune-Satara but postponed in Kolhapur)


'संप मागे न घेतल्यास पगारवाढीवर पुनर्विचार'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संप मागे न घेतल्यास पगारवाढीवर पुनर्विचार करू असा इशारा एसटी कर्मचाऱ्यांना परिवहन मंत्र्यांनी दिल्यानंतरही अनेक ठिकाणी एसटी संप सुरूच आहे. सातारा जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांना 20 व्या दिवशी संप सुरूच आहे. एसटी कर्मचारी विलीनीकरणावर ठाम आहेत. काही ठिकाणी संप मोडीत काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. संपकरी कर्मचाऱ्यांच्या न जुमानता साकोली आगारातून पुन्हा एक बस संध्याकाळी भंडारासाठी निघाली होती. साकोलीवरुन भंडाराला 10 प्रवासी तर भंडारा- साकोली 36 प्रवासी असा तब्बल 46 प्रवाशांनी या बसमधून प्रवास केला. दुहेरी फेरितून 1 हजार 735 रूपयांचे उत्पन्न मिळाले. 


काही कर्मचारी कामावर रुजू


नाशिक शहरामध्ये एसटी महामंडळामध्ये काही कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू होत बसेसची प्रवासी वाहतूक सुरू केली. पगारवाढ व्हावी म्हणून संपामध्ये सहभाग घेतला होता मात्र विलीनीकरणाच्या मुद्द्यावर त्यांनी एक पाऊल मागे घेतलंय. पोलिसांच्या कडक बंदोबस्तात ठक्कर बाजार परिसरातून बस रवाना झाल्या. काही कर्मचारी अद्याप संपावर ठाम असल्याने काही काळ तणाव होता.  



राज्यात अनेक ठिकाणी एस टी कर्मचारी कामावर रुजू होत असले तरी पुण्यात त्यांचा संप सुरूच आहे. दुसरीकडे खासगी बसेस च्या माध्यमातून प्रवासी वाहतूक सुरू आहे.. स्वारगेट बस स्थानकावर प्रवाशांचा खोळंबा होत असल्याचं चित्र आहे. निलंबनाच्या कारवाईनंतरही नाशिकमधील मनमाड आगारात एसटी कामगारांचा संप सुरुच आहे. मनमाडमध्ये संपाचा आजा 22ला दिवस आहे. आज सकाळपासून मनमाड आगारातून एकही बस बाहेर जाऊ शकली नाही. त्यामुळे मनमाड बसस्थानकात शुकशुकाट आहे. 


औरंगाबादमध्ये एसटी सेवा बंद


औरंगाबादमध्ये अजूनही एसटी सेवा बंद आहे.कर्मचारी अजूनही संपावर ठाम आहे त्यामुळे औरंगाबाद डेपो मध्ये एकही बस बाहेर पडली नाही ..गेले दोन दिवस खासगी वाहन चालकाच्या मदतीने शिवशाहीची पुण्यासाठी सेवा सुरू करण्यात आली आहे तेवढीच सेवा सध्या सुरू आहे.


रत्नागिरीत लालपरीला अद्याप ब्रेकच 


रत्नागिरीमध्येही एसटीच्या लालपरीला अद्याप ब्रेकच असल्याचे चित्र आहे. जिल्ह्याच्या मुख्य रहटाघर बस स्थानकातून एकही बस धावलेली नाही. बस स्थानकावर सध्या शुकशुकाट पहायला मिळतोय. एसटीचे चालक आणि वाहक संपाच्या भूमिकेवर ठाम आहेत. 203 एसटी कर्मचारी कामावर परतल्याचा दावा प्रशासनानं केलाय.