ST Employee Salary : बातमी एसटी कर्मचाऱ्यांसंदर्भातील. (ST Employees News) जानेवारी महिना अर्धा संपत आला तरी एसटी कर्मचाऱ्यांना पगार (MSRTC salary) झालेला नाही. त्यामुळे ते आक्रमक झालेत. संपादरम्यान पगारासाठी 4 वर्षे पूर्ण रक्कम देण्याचं, तसंच प्रत्येक महिन्याच्या 7  ते 10 तारखे दरम्यान वेतन (ST workers salary) देण्याचं सरकारनं मान्य केलं होतं. मात्र ते पाळण्यात येत नसल्यामुळे 90 हजार एसटी कर्मचारी नाराज आहेत.  (Maharashtra State Road Transport Corporation Salaries News) यासंदर्भात एसटी संघटनेनं महामंडळाला न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी अवमान याचिका दाखल करावी लागेल, अशी नोटीस बजावली आहे. सरकारकडून अपुरा आणि वेळेवर मिळत नसलेल्या निधीमुळे कर्मचाऱ्यांचं वेतन लांबणीवर पडू लागले आहे.


 एसटी कर्मचाऱ्यांना 12 तारीख उलटून गेल्यानंतरही वेतन नाही


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

महाआघाडीचे सरकार असताना एसटी कर्मचाऱ्यांनी अनेक मागण्यांसाठी आंदोलन केले होते. प्रामुख्याने पगार वाढीची यात मागणी होती. मात्र, मोठे आंदोलन करुनही त्यांच्या पदरी निराशाच दिसून येत आहे. राज्यात सत्तारानंतरही काहीही बदल झालेला नाही. पगार वाढ सोडा वेळेवर पगार होत नसल्याने एसटी कर्मचारी (ST Workers Salary) नाराज आहेत. एसटी कर्मचाऱ्यांना 12 तारीख उलटून गेल्यानंतरही वेतन मिळाले नाही. तसा आरोप महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने केला आहे. राज्य सरकारकडून न्यायालयात 7 तारखेदरम्यान पगार होईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे राज्य सरकारकडून न्यायालयाचा अवमान सुरु असून शिंदे-फडणवीस सरकारची कामगार विरोधी भूमिका उघड झाली असल्याचा आरोप महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केला आहे. 


राज्य सरकारला धडा शिकवण्याचा इशारा


एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात वेतनासाठी चार वर्षे पूर्ण रक्कम देण्याचे तसेच प्रत्येक महिन्याच्या 7 ते 10 तारखे दरम्यान वेतन देण्याचे न्यायालयाने नेमलेल्या तीन सदस्यीय समितीने सरकारच्यावतीने न्यायालयात सांगण्यात आले होते.आता महिन्याची 12 तारीख उलटून गेली तरी सरकारकडून निधी न मिळाल्याने  एसटी कर्मचाऱ्यांचे पगार रखडलेले आहेत.


राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांशी दुजाभाव करीत असल्याचा आरोप करण्यात आला असून सरकारला कायदेशीर मार्गाने धडा शिकवला जाईल असा इशारा  श्रीरंग बरगे यांनी दिला आहे. दरम्यान, वर्षानुवर्षे दर महिन्याच्या 7 तारखेला कर्मचाऱ्यांना वेतन मिळायचे. पण या महिन्यात सुद्धा 10 तारखेलादेखील वेतन मिळालेले नाही. या विषयावर सरकार अजिबात गंभीर नसल्याचे दिसून येत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. भाजपाचा दुटप्पीपणा समोर आला असल्याचा हल्लाबोल बरगे यांनी केला आहे.