प्रशासनाचा अल्टीमेटम धुडकावत एसटी कर्मचारी संपावर ठाम
सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी एसटी कर्मचा-यांनी ऎन दिवाळीत संप पुकारला आहे. त्यामुळे दिवाळी साजरी करण्यासाठी गावाला जाणा-या प्रवाशांचे हाल होत आहेत.
मुंबई : सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी एसटी कर्मचा-यांनी ऎन दिवाळीत संप पुकारला आहे. त्यामुळे दिवाळी साजरी करण्यासाठी गावाला जाणा-या प्रवाशांचे हाल होत आहेत.
अशात मंगळवारी सरकारचा कामावर हजर होण्याचा अल्टीमेटम कर्मचा-यांनी धुडकावून लावला. त्यामुळे आजही प्रवाशांचे हाल होणार आहेत. एसटी कर्मचारी दुस-या दिवशीही संपावर कायम आहेत.
१७ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून एसटी कर्मचारी संपावर गेले आहेत. त्यामुळे मध्यरात्रीपासूनच प्रवाशांची गैरसोय झाली आहे. या संपात मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेसह सहा संघटना सहभागी आहेत. दिवाळी सणाला सुरुवात झाल्याने ऐन दिवाळीच्या हंगामात होत असलेल्या या संपाने एसटी प्रशासनाची कोंडी होण्याची शक्यता आहे.
आज सकाळी कामावर हजर राहण्याचे आदेश सरकारने दिले होते. कामावर हजर न राहिल्यास निलंबनाची कारवाई करण्यात येईल सांगण्यात आले होते. मात्र एसटी कर्मचाऱ्यांनी प्रशासनाचा कामावर रुजू होण्याचं आवाहन धुडकाव संप कायम ठेवला आहे. दरम्यान, एसटी महामंडळाकडून एक परिपत्रक काढण्यात आले असून कर्मचारी कामावर रूजू न झाल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.