धक्कादायक! चंद्र ग्रहणाच्या दिवशी आजीने केला नातीचा खून; तीन वर्षानंतर समोर आले हत्येचे कारण
तीन वर्षापूर्वी झालेल्या या घटनेचा पोलिसांनी उलघडा करत आजीला अटक केली आहे
Grandmother killed her granddaughter : काही दिवसांपूर्वी सांगलीच्या म्हैसाळमध्ये एकाच कुटुंबातील नऊ जणांची गुप्तधनाच्या लालसेतून हत्या करण्यात आली होती. सुरुवातीला ही सामूहिक हत्या असल्याचे म्हटले जात होते. मात्र पोलिसांनी अधिक तपास करत या प्रकरणी सोलापूरमधील दोन भोंदूना अटक केली होती. असाच काहीसा प्रकार साताऱ्यातही (Satara) घडल्याचे समोर आले आहे. तीन वर्षानंतर या प्रकरणाचा उलघडा झाला आहे.
साताराऱ्यातील पाटण तालुक्यातील करपेवाडीत १६ वर्षांच्या मुलीचा तीन वर्षापूर्वी खुन झाल्याची घटना घडली होती. अंधश्रद्धेतून गुप्तधनासाठी या मुलीचा खून तिच्याच आज्जीने केल्याची (Grandmother killed her granddaughter) धक्कादायक बाब पोलीस तपासात पुढे आली आहे. या प्रकरणी सातारा पोलीसांनी मुलीच्या आजीसह,गावातील एक महिला आणि दोन मांत्रिकाना तीन वर्षानंतर अटक केली आहे.या सर्वांवर जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुप्तधनासाठी मांत्रिकाच्या सांगण्यावरुन आजीनेच नातीचा नरबळी दिल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. २२ जानेवारी २०१९ रोजी करपेवाडी या गावात एका १६ वर्षाच्या मुलीचा खून झाला होता. या प्रकरणात सुरवातीला पोलीसांचा संशय मुलीच्या आई वडिलांवर होता. मात्र तपास सुरु असताना काही पुरावे मिळाल्यांनंतर हा खून रंजना साळुंखे या मुलीच्या आजीनेच केला असल्याचं उघड झाले .गावातील एका महिलेच्या मदतीने आजीने हा खून चंद्र ग्रहणाच्या दिवशी गुप्तधनाच्या हव्यासापोटी केल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे.