मुंबई : देशभरात coronavirus कोरोना रुग्णांची संख्या अतिशय झपाट्यानं वाढत असतानाच महाराष्ट्रातही असंच चित्र दिसत आहे. गणेशोत्सवानंतर अनेक ठिकाणी नियंत्रणात आलेला रुग्णसंख्या वाढीचा वेग आणखी  वाढला होता. पण, अखेर अनेक प्रयत्न आणि नागरिकांच्या सतर्कतेमुळं काही अंशी नियंत्रणात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार दिवसभरात राज्यात ३०९ कोरोना बाधितांना प्राण गमवावे लागले आहेत. तर, १०,७९२ नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. इथं लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे, दिवसभरात कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांचा आकडाही दिलासादायक असल्याची स्पष्ट होत आहे. आज दिवसभरात तब्बल १०, ४६१ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. 


कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ आरोग्य यंत्रणा आणि प्रशासनाच्या प्रयत्नांना यश मिळवून देत असल्याचं पाहायला मिळत आहे. आतापर्यंत राज्यात तब्बल १२,६६,२४० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, रुग्ण बरे होण्याचं एकूण प्रमाण ८२. ८६ टक्क्यांवर पोहोचलं आहे. 


 


एकिकडे राज्यातील कोरोना रुग्णांचा वेग अंशत: मंदावतानाच एकूण रुग्णसंख्येचा आकडा मात्र १५, २८, २२६ वर पोहोचला आहे. इथं लक्षात घेण्याजोगी बाब म्हणजे, नागरिकांनी प्रशासनानं घालून दिलेले नियम पाळत, लॉकडाऊन आणि अनल़ॉकमधील सर्व अटी, नियमांचं पालन केल्याचेच हे परिणाम दिसत आहेत. यामध्ये प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांचा मोलाचा वाटा आहे हेसुद्धा तितकंच खरं. त्यामुळं कोरोनाला रोखण्याची मोठी जबाबदारी ही प्रशासन आणि आरोग्य यंत्रणांसोबतच राज्यातील जनतेचीही असेल.