पुणे : पुण्यातील मेमोरिअल शाळेत बाऊन्सर प्रकरणाची दखल शिक्षण मंत्री बच्चू कडू यांनी घेतली आहे. झी 24तासनं शालेय शिक्षण मंत्र्यांपर्यंत हा मुद्दा उपस्थीत केला.. त्यानंतर त्यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून मुख्याध्यापकांवर कारवाईचं आश्वासन दिलं आहे. तसंच शाळेत बाऊंसरच्या वाढत्या ट्रेंडबद्दल मंगळवारी बैठक घेऊन निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुण्याच्या क्लाइन मेमोरियल स्कूलमध्ये गोंधळ झाला आहे. प्रिन्सिपलच्या ऑफिसमध्ये पालकांचा घेराव पाहायला मिळाला. भाजप जनता युवा मोर्चाची शाळेत घोषणाबाजी करण्यात आली आहे. शाळेच्या कर्मचारी आणि कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाल्यानंतर शाळेत पोलीस आले आहेत.


मुख्यमंत्र्यांचा आरोप 


मागील ३ वर्षांचा फी पालकांनी भरलेली नाही. पालक गेल्या ३ वर्षांपासून त्रास दिल्याचा आरोप देखील मुख्याध्यापकांनी लावला आहे. ७० टक्के पालकांनी अद्याप शाळेची फी भरलेली नाही, असा आरोप मेमोरिअल शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा सिंह यांनी पालकांवर केलेला आहे. 


काय आहे प्रकरण?


पुण्याच्या बिबवेवाडीतील क्लाइन मेमोरियल स्कूलमध्ये महिला बाऊन्सरने पालकांना मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.


फी भरण्याच्या वादावरून प्रिन्सिपलनेच पालकांना मारहाण करण्यास सांगितल्याचा आरोप करण्यात आला आहे. मुलाची शाळेची फी भरण्यावरून संबंधित पालक आणि प्रिन्सिपल यांच्यामध्ये वाद झाला आणि त्यानंतर मारहाण करण्यात आली.


मयुरेश गायकवाड यांनी याप्रकरणी तक्रार केली असून, बिबवेवाडी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली.


तर या सर्व प्रकरणाबाबत क्लाइन मेमोरियल स्कूलच्या प्रिन्सिपल सुनंदा सिंग यांनी पालकांवरच आरोप करत गेले तीन वर्षे 70 टक्के पालकांनी फीच भरली नसल्याचा दावा केलाय...