CORONA : राज्य सरकारची नवी नियमावली जाहीर, जाणून घ्या काय आहेत नवे नियम
राज्य सरकारने कोरोनाबाबत नव्या नियमावली जाहीर केल्या आहेत.
दीपक भातुसे, मुंबई : राज्य सरकारने कोरोनाबाबत नव्या नियमावली जाहीर केल्या आहेत. राज्यात कोरोना रुग्णांची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता राज्य सरकारने आता कठोर निर्बंध लागू करण्यात येत आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची वाढती रुग्णसंख्या पाहता अनेक ठिकाणी लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्य सरकारची नवी नियमावली
- सिनेमागृह हॉटेल, रेस्टॉरंट 50% क्षमतेने सुरू राहणार
- राजकीय सांस्कृतिक कार्यक्रम बंदी
- लग्नासाठी 50 लोकांची मर्यादा
- अंत्यसंस्कार 20 लोकांची मर्यादा
- खाजगी कार्यालय उपस्थित 50 टक्के
राज्यात आजही कोरोनाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. आज कोरोनाचे 15 हजार 51 नवे रूग्ण वाढले आहेत. आज दिवसभरात 48 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत 1 हजार 713 रूग्णांची नोंद झाली आहे. सलग पाचव्या दिवशी राज्यात 15 हजारांहून जास्त रुग्ण वाढले आहेत.
सध्या 2021 वर्षातला मार्च महिना सुरु आहे आणि राज्य पुन्हा एकदा मार्च 2020च्या उंबरठ्यावर उभं आहे. कारण मागच्या वर्षी याच महिन्यात कोरोनाच्या प्रसारामुळं राज्यासह संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषीत करण्यात आला होता. नवीन वर्षाच्या सुरुवातीला कोरोना रुग्णवाढ दिवसाला 1 हजारापर्यंत खाली आली होती. पण पुन्हा एकदा राज्यात दिवसाला 16 हजारांच्या वर कोरोना रुग्ण सापडत आहेत.
देशातले तब्बल 60 टक्के रुग्ण सध्या एकट्या महाराष्ट्रात सापडताहेत. त्यामुळं पुन्हा एकदा महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर आहे.
संबंधित बातमी : Corona : पंतप्रधान मोदींनी बोलावली सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक