Osmanabad : केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांनी (Union State Health Minister Bharti Pawar) धाराशिव (Osmanabad) शासकीय रुग्णालयास भेट देत तेथील यंत्रणेची पोलखोल केली. शासकीय रुग्णालयात काही औषधे उपलब्ध नसल्याने रुग्णांना खासगी दुकानातून (private medical) खरेदी करण्याचा सल्ला देण्यात येत होता. यावेळी भारती पवार स्वतः रांगेत उभ्या राहिल्या आणि औषधांची मागणी केली. यावेळी औषधे उपलब्ध नसल्याचे बाहेरच्या मेडिकलमधून ती आणण्यास सांगितली. यानंत भारती पवार यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. रुग्णालयात औषधे का उपलब्ध नाहीत असा सवालही यावेळी भारती पवार यांनी कर्मचाऱ्यांना विचारला. त्यानंतर आता राज्याच्या आरोग्यमंत्र्यांनी (Tanaji Sawant) प्रतिक्रिया दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्याच जिल्ह्यात हा सर्व प्रकार घडल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या सर्व प्रकारानंतर तानाजी सावंत यांनी माध्यमासोबत बोलताना कावळा बसायला आणि फांदी तुटायला अशी प्रतिक्रिया दिली आहे. शासकीय रुग्णालयात औषधांचा तुटवडा असल्याचं जाणवल्यानंतर केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनी डॉक्टरांना खडे बोल सुनावले होते. यावेळी भारती पवार यांनी राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची एकप्रकारे पोलखोल केल्याचे पाहायला मिळालं.


काय म्हणाले तानाजी सावंत?


"आता भरती प्रक्रिया चालू करण्यात आली आहे. औषधांच्या बाबतीत आमच्या खात्याने नवीन धोरण अवलंबले असून आठ ते दहा दिवसात ते दिसेल. काही ठिकाणी औषधे मिळतात तर काही ठिकाणी मिळत नाहीत हे सत्य आहे. ज्या ठिकाणी औषधे मिळत नाही त्या ठिकाणी आम्ही अधिकाऱ्यांना त्यांच्या पातळीवर ते खरेदी करण्याचे अधिकार दिले आहेत. रुग्णांना औषधे नाहीत असे सांगू नका. कावळा बसायला आणि फांदी तुटायला. राज्यमंत्री तिथे गेल्यानंतर त्यांना औषधे मिळाली नाहीत हे दुर्दैव आहे. तिथे जाऊन त्याची चौकशी करणार आहे," असे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी म्हटले आहे.