Nana Patole : मांजर आडवी जाऊ नये यासाठी नाना पटोले प्रयत्न; गेटवरच थांबले आणि...
चिंचवड पोटनिवडणुकबाबत चर्चा करायला नाना पटोले पुण्यात काँग्रेस भवनात आले. तिथे त्यांच्या स्वागतासाठी शहराध्यक्ष अरविंद शिंदे गेटवर जाऊन थांबले. तिथे एक मांजर होती. ती पटोलेंना आडवी जाऊ नये म्हणून अरविंद शिंदेंनी तिला पिटाळून लावलं.
सागर आव्हाड, झी मीडिया, पुणे : मांजर आडवी जाणे हा अशुभ संकेत मानला जातो. नेमकी याची भिती काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( State President of Congress Party Nana Patole ) यांना वाटली तर नाही ना असा प्रश्न उपस्थित करणारा प्रकार पुण्यात घडला आहे. नाना पटोले यांना मांजर (Cat) आडवी जाऊ नये यासाठीचा प्रयत्न कॅमे-यात कैद झाला आहे.
कसबा, चिंचवड पोटनिवडणुकबाबत चर्चा करायला पटोले पुण्यात काँग्रेस भवनात आले. तिथे त्यांच्या स्वागतासाठी शहराध्यक्ष अरविंद शिंदे गेटवर जाऊन थांबले. तिथे एक मांजर होती. ती पटोलेंना आडवी जाऊ नये म्हणून अरविंद शिंदेंनी तिला पिटाळून लावलं.
नेमकं काय झाल?
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणुक जाहीर झाली आहे. त्या निवडणुकी करीता भाजपकडून कसबा पेठ विधानसभा मतदारसंघासाठी हेमंत रासने तर चिंचवड विधानसभा मतदार संघासाठी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर हेमंत रासने यांनी मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांची केसरीवाडा येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यावेळी शैलेश टिळक यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना उघड उघड नाराजी देखील व्यक्त केली. या सर्व घडामोडी दरम्यान रविवारी पुण्यातील काँग्रेस भवन येथे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची आमदार संग्राम जगताप,शहराध्यक्ष अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवारांसोबत बैठक घेण्यात आली. मात्र, त्या बैठकीपूर्वी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे काँग्रेस भवन येथे काही मिनिटात पोहोचणार अशी माहिती शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांना मिळाली. त्यानंतर अरविंद शिंदे हे सहकार्यासह गेटवर जाऊन थांबले. त्याच दरम्यान नाना पटोले यांच आगमन झाले.
नाना पटोले यांच सर्वांनी स्वागत केल्यावर ते पुढे काही पावल चालत होते. तेवढ्यात एक मांजर नाना पटोले यांच्या मार्गामध्ये आडवी जाण्याची शक्यता होती. हे ओळखून शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांची मांजरीला बाजूला करण्याची एकच धडपड पाहण्यास मिळाली आणि त्यांची धडपड यशस्वी देखील झाली.
पुण्यात मांजरी वरुन राडा
मांजरीवरुन पुण्यात चक्क हाणामारी झालीय. तुझी मांजर माझ्या दारात येऊन म्याव म्याव का करते, याचा जाब विचारल्यावर दोन महिलांमध्ये तुफान हाणामारी झाली. आणि अखेर मांजरीचा वाद पोलीस स्टेशनमध्य पोहोचला. खडकी परिसरात एका सोसायटीमध्ये उषा वाघमारे आणि रेश्मा शेख शेजारी-शेजारी राहतात. रेश्मा यांच्याकडे एक मांजर आहे. ही मांजर शेजारी उषा यांच्याकडे गेली आणि म्याव म्याव करु लागली. तुझी मांजर माझ्याकडे येऊन का म्याव म्याव करते, असा जाब उषा यांनी विचारला. त्यावरुन दोघींचं भांडण सुरू झालं. हे भांडण एवढं टोकाला गेलं की उषा आणि रेश्मामध्ये हाणामारी झाली. आणि हा वाद थेट खडकी पोलीस ठाण्यात पोहचला. पोलिसांनी दोघांची बाजू ऐकून एकमेकांविरोधात तक्रार दाखल केली आहे.