औरंगाबाद : गेल्या १६ दिवसांपासून सुरु असलेली औरंगाबादची कचराकोंडी आजही कायम आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र, आज रास्ता रोको करणाऱ्या नागरिकांनी आपली संयम गमावला. कचरा टाकण्यासाठी आलेल्या गाडीवर त्यांनी दगडफेक केली. गोलवाडीत ही घटना घडली. 


या दगडफेकीनंतर कचरा टाकण्यासाठी  'जाए तो जाए कहाँ', असा प्रश्न महापालिकेला पडलाय. या प्रकरणाची आता पुन्हा सोमवारी हायकोर्टात सुनावणी होणार आहे. 


गोलवाडी, कांचनवाडीत रस्त्यावर उतरलेले नागरिक कचरा टाकू न देण्यावर ठाम आहेत. त्यामुळे महापालिका कर्मचाऱ्यांना आणि प्रशासनाला चांगलाच झटका बसलाय. 


दोन दिवसांपूर्वी औरंगाबादमध्ये निर्माण झालेल्या कचरा कोंडीवर तोडगा काढण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. सर्व अधिकारी आणि नारेगावचे ग्रामस्थ या बैठकीत उपस्थित होते. यावेळी प्रशासन आणि विभागीय आयुक्तांनी नारेगावच्या ग्रामस्थांची समजूत काढत त्यांना तीन महिना मुदतीची मागणी केली. तसंच कचरा प्रश्न सोडवण्यासोबतच नारेगावच्या विकासासाठी विशेष निधी देण्याचीही तयारी त्यांनी दर्शवली. मात्र नारेगावचे ग्रामस्थ कचरा टाकू न देण्यावर ठाम आहेत. कुठल्याही परिस्थितीत ते माघार घेण्यास तयार नाहीत. त्यामुळे प्रशासनाने आयोजित केलेली बैठक निष्फळ ठरली.