Lonavala Bhushi Dam : लोणावळ्याच्या भूशी डॅमच्या बॅकवॉटरमध्ये एक संपूर्ण कुटुंब वाहून गेलं. यात पाच जणांना जीव गमवावा लागला.. साहिस्ता अन्सारी, अमिमा अन्सारी, उमेरा अन्सारी, अदनान अन्सारी आणि मारिया अन्सारी अशी या मृतांची नावं आहेत. पिकनिकसाठी जर तुम्ही लोणावळ्यात फिरायला जाण्याच्या विचारात असाल, तर वेळ बघा आणि मगच निर्णय घ्या. कारण या दुर्घटेनंतर लोणावळ्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी कडक नियमावली जाहीर केली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोणावळ्यातील धबधब्यात अन्सारी आणि सय्यद कुटुंबीय वाहून गेल्यानं पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. याच अनुषंगाने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कठोर कारवाईचे आदेश दिलेत. संध्याकाळी सहा नंतर पर्यटकांना पर्यटनस्थळी फिरण्यास मज्जाव करण्यात आले आहे. याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पर्यटकांना आणि कारवाईत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ही बडगा उगारला जाणार आहे. असं पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंनी जाहीर केलंय. पुढच्या काही तासांत लोणावळ्यातील पर्यटनासाठी विशेष नियमावली जाहीर केली जाणार असल्याचं ही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.


भुशी धरण बॅक वॉटरफॉल वर जाण्यासाठी बंदी असल्याचे बोर्ड लावण्यात आले आहे. संपूर्ण जंगल परिसर असताना देखील हे अन्सारी व खान कुटुंब या जंगलातून वाट काढत त्या ठिकाणी गेले. मात्र धोकादायक पद्धतीने पर्यटन करणे त्यांच्या जीवावर बेतले.लोणावळ्यातील धबधब्यात अन्सारी आणि सय्यद कुटुंबीय वाहून गेल्यानं पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. याच अनुषंगाने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कठोर कारवाईचे आदेश दिलेत. संध्याकाळी सहा नंतर पर्यटकांना पर्यटनस्थळी फिरण्यास मज्जाव करण्यात आलंय. याकडे दुर्लक्ष करणाऱ्या पर्यटकांना आणि कारवाईत हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर ही बडगा उगारला जाणार आहे. असं पुण्याचे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंनी जाहीर केलंय. पुढच्या काही तासांत लोणावळ्यातील पर्यटनासाठी विशेष नियमावली जाहीर केली जाणार असल्याचं ही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.