Coronavirus : राज्यात नव्याने मार्गदर्शक सूचना जारी, या सहा जिल्ह्यांत कडक निर्बंध
राज्यातले सर्व जिल्हे लेव्हल-3 मध्ये टाकून कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. (Corona new guidelines)
मुंबई : राज्यातले सर्व जिल्हे लेव्हल-3 मध्ये टाकून कडक निर्बंध लागू करण्यात येणार आहेत. (Corona new guidelines) मात्र कोरोना (Coronavirus) रुग्णसंख्या अजूनही कमी होत नसल्यामुळे पुणे, कोल्हापूर साताऱ्यासह सहा जिल्ह्यांना लेव्हल चारमध्येच ठेवण्यात येणार आहे. यात कोकणातील तिन्ही म्हणजे रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्गही लेव्हल चारमध्ये असणार आहे. त्यामुळे या सहा जिल्ह्यांमधील निर्बंध अधिक कडक असणार आहेत.
राज्यात तिस-या लाटेचं संकट गडद झाल्यामुळे पुन्हा कडक निर्बंध लागू होणार आहेत. राज्य सरकारनं यासंदर्भात गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. तसंच तिस-या लाटेला रोखण्यासाठी काय तयारी करावी लागणार आहे यासंदर्भातला हा विशेष रिपोर्ट. डेल्टा प्लसने धोका वाढवला आहे. त्यामुळे अनलॉकच्या नियमांत मोठे बदल करण्यात आले आहेत.
राज्यात पुन्हा कडक निर्बंध
डेल्टा प्लस महाराष्ट्रात आल्यावर आणि त्याने पहिला बळी घेतल्यावर राज्य सरकारनं तातडीनं अनलॉकचे नियम बदललेत. आता राज्यातले सगळेच जिल्हे तिसऱ्या टप्प्याच्या वरच असणार आहेत. या आठवड्यातील निर्बंधच पुढील आठवड्यात कायम राहणार आहेत. शाळा, महाविद्यालये 15 जुलैपर्यंत बंद राहणार आहेत. कोरोना भागात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील कोरोना रुग्णांची सद्याची संख्या पाहता या आठवड्यातील निर्बंधच पुढील आठवड्यात कायम राहतील. तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता नागरिकांनी अधिक जबाबदारीने वागावे, असे आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.
पुणे जिल्ह्यात ग्रामीण आणि शहरी भागात लसीकरणाचे प्रमाण वाढविण्याची गरज आहे. तसेच नियोजन करुन पेसा भागातील नागरिकांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करावे. सुपर स्प्रेडर, दुकानदार, मार्केटमधील व्यवसायिक यांची कोरोना चाचणी करण्याचे प्रमाण वाढविण्यात आलेले आहे. तसेच दर पंधरा दिवसांनी रॅपिड ॲन्टीजन टेस्ट ( RAT) बंधनकारक करण्यात आलेली आहे.
पुन्हा कडक निर्बंध, नव्या मार्गदर्शक सूचना
- अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी 7 ते 2 वाजेपर्यंत सुरू राहणार
- इतर दुकानं सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते 2 पर्यंत सुरू राहणार
- मॉल्स, थिएटर बंदच राहतील
- रेस्टॉरंट 50 टक्के क्षमतेनं सकाळी 7 ते 2 सुरू राहतील
- दुपारी 2 नंतर होम डिलिव्हरी सेवा सुरू राहिल
- लोकल सेवा बंदच राहिल
- सार्वजनिक मैदानं, बागा, वॉकिंग ट्रॅक, सायकलिंगला सकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत परवानगी
- खाजगी, शासकीय कार्यालयं 50 टक्के उपस्थितीत सुरू राहणार
- चित्रपट, मालिकांच्या चित्रिकरणास स्टुडिओत परावनगी
- लग्न सोहळ्याला 50 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी
- अत्यंसंस्कारासाठी 20 लोकांना उपस्थित राहता येणार