मुस्तान मिर्झा, झी मीडिया, उस्मानाबाद : उस्मानाबादमध्ये पोलीस खात्यात धक्कादायक प्रकार घडला आहे. सिटी पोलीस स्टेशनच्या महिला पोलीस उपनिरीक्षक यांनी वरिष्ठाच्या त्रासाला आणि स्थानिक पत्रकाराच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मार्च महिन्यात उस्मानाबादच्या आनंदनगर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असताना त्याच पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक खाडे यांनी त्यांचा लैंगिक छळ केला होता. तशी महिला पोलिसाने २८ मार्च रोजी स्टेशन डायरीमध्ये नोंद केली होती. त्यानंतर पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी याबाबत चौकशीसाठी वरिष्ठांची समिती नेमली होती. मात्र कारवाई न करता यांची उस्मानाबाद शहर पोलीस स्टेशनमध्ये बदली करण्यात आली होती.


आनंद नगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक खाडे यांच्या त्रासाला आणि स्थानिक पत्रकार विकास खाडे याच्या ब्लॅकमेलिंग ला कंटाळून त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचा आरोप यांच्या आई-वडिलांनी केला आहे. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना पुढील उपचारासाठी सोलापूरला पाठवण्यात आलं आहे. या घटनेमुळे पोलीस खात्यात खळबळ उडाली आहे.