अहमदनगर : नेवासा येथील संकेत पांडुरंग घोरतळे या २२ वर्षांच्या तरुणानं सोमवारी रात्री उशिरा आपल्या राहत्या घरी आत्महत्या केलीय. स्वतःच्या डोक्यात गावठी कट्ट्यातून गोळी घालून त्यानं आत्महत्या केलीय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही गोष्ट कुटुंबीयांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्याला ताबडतोब नगरच्या सिव्हिल हॉस्पीटलला उपचारासाठी हलवलं... इथंच उपचार सुरु असताना संकेतनं अखेरचा श्वास घेतला. 


संकेतनं हे टोकाचं पाऊल का उचललं? त्याचं कारण मात्र समजू शकलेलं नाही. या घटनेने संपूर्ण नेवासा शहरात खळबळ उडालीय. शहरात दिवसभर हळहळ व्यक्त होत होती.
 
नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीणचंद लोखंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी, मृतदेहाचे शवविच्छेदन औरंगाबाद येथील घाटी रुग्णालयात करण्यात येणार असल्याची माहिती दिली.