MPSC परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विदयार्थ्याची आत्महत्या, नैराश्येतून उचललं पाऊल
नैराश्येतून राहत्या घरी गळफास घेत केली आत्महत्या
दौंड : दौंड तालुक्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. MPSC च्या अभ्यास करणाऱ्या युवकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. दौंड तालुक्यातील देऊळगाव गाडा गावात राहणाऱ्या मल्हारी बारवकर या युवकाने नैराश्यातून आत्महत्या केली.
स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मल्हारी बारवकरने MPSCच्या दोन ते तीन परीक्षा दिल्या होत्या. मल्हारीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. नैराश्यातून त्याने ही आत्महत्या केल्याचं बोललं जात आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने सुसाईड नोट लिहिली होती. त्यात त्याने नैराश्यातून आत्महत्या केल्याचं म्हटलं आहे.
सुसाईड नोटमध्ये काय लिहिलंय?
मी तुम्हाला दाखवलेली स्वप्न पूर्ण करु शकत नाही आणि तुमचे पडलेले चेहेरही पाहू शकत नाही. आत्महत्येस कोणीही जबाबदार नाही. अतिविचार, संपलेला आत्मविश्वास, भविष्यातही काही सकारात्मक चित्र दिसत नाही. चांगलंच जगण्याचा सगळ्या आशा संपल्या आहेत. Sorry... असं मल्हारीने सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं.
पुण्यातील स्वप्नील लोणकर पाठोपाठ एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या मल्हारी बारवकरच्या आत्महत्यने हळहळ व्यक्त होते आहे.