परभणी : जिल्ह्यातील जिंतूर तालुक्यात येणाऱ्या बोर्डी येथील अंगणवाडी सेविकेने पंचायत राज समिती समोर गेल्या दहा वर्षांचे रजिस्टर सादर करण्याचे सांगितले होते. त्याच्या भीती पोटी बोर्डी येथील अंगणवाडी सेविका सुमित्रा सवंडकर यांनी गळफास लावून आत्महत्या केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मागील दहा वर्षापैकी पाच वर्ष अंगणवाडी मंदिरात भरत होती. त्यावेळी मंदिरातून रजिस्टर गहाळ झाले. एका वर्षात दहा रजिस्टर होतात, मागील दहा वर्षांचे शंभर रजिस्टर सांभाळणं शक्य नव्हतं, असे मृत सेविकेने लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत म्हटलं आहे. 


पाच महिने नियमित पगारी होत नाहीत. त्यात आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत असल्याने गळफास घेऊन त्यांनी राहत्या घरात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. दिवाळीत सरकारने पगार दिले नाही.  या सोबत कौटुंबिक अडचणींचा पाढा वाचत महिलेने आत्महत्या केल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.