राज्यात महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न गंभीर बनतोय - सुप्रिया सुळे
महिला अत्याचाराच्या गुन्ह्यात देशात महाराष्ट्राचा वरचा क्रमांक लागत असल्याचे राष्ट्रवादी नेत्या सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
पुणे : राज्यातील महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न गंभीर बनलाय. सरकारच्या क्राइम रिपोर्ट प्रमाणे महिला अत्याचाराच्या गुन्ह्यात देशात महाराष्ट्राचा वरचा क्रमांक लागत असल्याचे राष्ट्रवादी नेत्या सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.त्या बारामती दौऱ्यादरम्यान त्या बोलत होत्या. महाराष्ट्रातील आणि मुंबईच्या पोलिसांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. तरीही अत्याचार वाढत असतील तर ज्यांच्याकडे गृहखाते आहे ते राज्याचे मुख्यमंत्री काय करतात असा प्रश्न ही सुळे यांनी उपस्थित केला.