मुंबई : बॉलिवुड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करणाऱ्या नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोकडून रिया चक्रवर्तीची आज चौकशी होणार आहे. रिया, रियाचा भाऊ शौविक आणि नोकर दीपेश सावंत यांची समोरासमोर बसून चौकशी होईल अशी माहिती सुत्रांकडून मिळतेय.


अटकसत्र सुरुच 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या प्रकरणात मोठ्या माशाचा शोध सुरुयं. सुशांतच्या कथित मृत्यू प्रकरणी अटक सत्र सुरु झालंय. केसशी संबंधित ड्रग्ज कनेक्शचा तपास सुरु असल्याचे  नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोच्या डेप्युटी डीजींनी सांगितले. एनसीबीने शनिवारी रात्री उशीरा नोकर दीपेश सावंतच्या रुपात ८ वी अटक केली. 



सरकारी पुरावा 


एनसीबीकडून दीपेशला सरकारी पुरावा म्हणून सादर करण्यात येणारेय. दीपेश सावंत माफीचा साक्षीदार होण्यास तयार असल्याचं सुत्रांकडून समजतं आहे. दीपेश या प्रकरणात जी काही माहिती देईल ती महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. 


यापूर्वी सुशांत प्रकरणात चौकशी सुरु असताना, एनसीबीने शुक्रवारी अब्बास, करण, जैद, बासित आणि कैजान अशा 5 जणांना अटक केली होती. त्यापैकी अब्बास आणि करणला काही वेळातच जामीन मिळाला होता. तर कैजानला शनिवारी जामीन मिळाला आहे. त्याशिवाय एनसीबीने रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक आणि सुशांतचा मित्र सॅम्युअल मिरांडाला ताब्यात घेतलं आहे. 


सीबीआय टीम पुन्हा एकदा सुशांतच्या वांद्रेतल्या घरी चौकशीसाठी गेले होते. यावेळी सीबीआय टीमसोबत सुशांतची बहीण मितू सिंहही सुशांतच्या फ्लॅटवर हजर होती. नीरज, केशव, सिद्धार्थ पिठाणीही यावेळी फ्लॅटवर हजर होते. सीबीआयने पुन्हा एकदा १४ जूनच्या त्या दिवसाबाबत मितू आणि घरातल्या सदस्यांची चौकशी केली असून १४ जूनच्या दिवसाचं रिक्रिएशन केले आणि सीबीआय टीम निघून गेली.