प्रणिती शिंदे यांच्या लग्नाविषयी, सुशीलकुमार शिंदे म्हणाले...
सुशील कुमार शिंदे यांनी आपली कन्या प्रणिती यांच्या लग्नाविषयी स्पष्टपणे मत मांडताना म्हटलं आहे...
सोलापूर : आमदार प्रणिती शिंदे आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आणि यांचा आज वाढदिवस. प्रणिती शिंदे या फक्त राजकारणामुळेचं नाही, तर त्यांच्या सौंदर्यामुळेही ओळखल्या जातात. विधानसभा निवडणुकीत २०१४ मध्ये सोलापूरमधून त्या निवडून आल्या.
प्रणिती यांच्या लग्नाविषयी शिंदे यांचं स्पष्ट मत
जनसंपर्क, धाडसी आणि मनमिळावू स्वभाव, प्रभावी वत्कृत्वकला, या गुणांमुळे प्रणिती यांनी, सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रमाणे, अल्प कालावधीत स्वत:ला सिद्ध करून दाखवले आहे.
सुशील कुमार शिंदे यांनी आपली कन्या प्रणिती यांच्या लग्नाविषयी स्पष्टपणे मत मांडताना म्हटलं आहे, ' आपली कन्या, प्रणिती यांनीही कुणासोबतही प्रेमविवाह केला, तरी आपली काही हरकत नसेल'
प्रणिती यांच्या बाबत शिंदे नेमके काय म्हणाले...
'प्रणितीने कुणाशीही लग्न करावे, पण तो कमावता असावा, त्याने तिला सांभाळले पाहिजे, तिला साथ दिली पाहिजे. मी प्रणितीला सांगितले आहे की, जात-पात या गोष्टी मी मानत नाही. तिच्या लग्नाच्या निर्णयाचे पूर्ण स्वातंत्र्य तिला आहे. मी देखील प्रेमविवाह केला आणि मी आंतरजातीय विवाहाचा समर्थक आहे', असे आमदार प्रणिती शिंदे या कधी लग्न करणार, या प्रश्नांवर सुशीलकुमार यांनी हे उत्तर दिलं आहे.