ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (sushma andhare) सध्या महाप्रबोधन यात्रेनिमित्त (maha prabhodhan yatra) कोकण (Kokan) दौऱ्यावर आहेत. गेल्या काही दिवसांपासून सुषमा अंधारे या शिंदे गटातील मंत्र्यासह भाजप नेत्यांनाही लक्ष्य करत आहेत. यादरम्यान, सुषमा अंधारे यांचे विभक्त पती अॅड. वैजनाथ वाघमारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत. यानंतर वाघमारे यांनी वैयक्तिक आयुष्याबाबत भाष्य केले होते. त्यादरम्यान, सुषमा अंधारे यांची लेक कबिरा चर्चेत आली होती. आता पुन्हा एकदा सुषमा अंधारे आणि त्यांच्या मुलीची चर्चा सुरुय. याला कारण ठरलीय सुषमा अंधारे यांची फेसबुक पोस्ट.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोकण दौऱ्यावर सुषमा अंधारे यांच्यासोबत त्यांची लेक कबिरा देखील आहे. यावेळी त्यांनी मुलीसोबत समुद्रकिनाऱ्यावर धमाल केली आहे. याचा फोटो त्यांनी फेसबुकवर पोस्ट केला आहे. यासोबत त्यांनी मी सारी जिंदगी माझी, तुला जपणार आहे…, अशी कॅप्शनही दिली आहे. यासोबत पी मुव्हमेंट्स, मालवण, बीच, कब्बू आणि लाईफलाईन असे हॅशटॅग दिले आहेत.



दरम्यान, सिंधुदुर्ग येथे झालेल्या सभेत सुषमा अंधारे यांनी राणे कुटुंबियांवर जोरदार टीका केली होती. "भाजपकडून भ्रमाचा भोपळा बनवून काम केले जाते आहे. त्यामुळेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने जनतेचे प्रबोधन केले जात आहे. त्यासाठीच ही महाप्रबोधन यात्रा आहे. सावरकर यांच्याबद्दल नारायण राणे यांच्या मुलाने ट्वीट केले होते. ते आम्ही लोकांना दाखवले तर पोलीस विभाग आम्हाला कारवाई करण्याची नोटीस पाठवत आहे," असे सुषमा अंधारे यांनी सभेत म्हटले होते.