पालघर : पालघरमध्ये काही संशयित आल्याच्या अफवांमुळे भितीचं वातावरण पसरलं आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून पोलिसांनी डहाणू घोडवरड परिसरात शोधमोहीम सुरु केली आहे. मात्र ही अफवा असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.


स्फोटकांचा साठा सापडला


दरम्यान पालघरच्या बोईसर पुर्वेकडी नागझरी इथं जिलेटीनच्या कांड्या आणि स्फोटकांचा साठाही सापडला आहे. पालघर गुन्हे शाखेनं हा स्फोटकांचा साठा जप्त केला आहे. नागझरी येथे घरात बेकायदेशीर पणे जिलेटीनचा साठा असल्याची माहिती पालघर गुन्हे शाखेला मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली.