शिवसेना, भाजपावर राणेंचा `प्रहार`
जाणून घ्या ते नेमकं म्हणाले तरी काय....
मुंबई : देशाच्या आणि राज्याच्या राजाकारणता दर दिवसाआड बऱ्याच घडामोडी पाहायला मिळतात. वादविवाद, मतभेद आणि टीकांच्या या सत्रात आता आणखी एका विषयाचा समावेश झाला आहे.
वैभववा़डी येथे पार पडलेल्या एका जाहीर सभेत नारायण राणे यांनी शिवसेना आणि सत्ताधारी भारतीय जनता पार्टी या दोन्ही पक्षांवर आपल्या शैलीत प्रहार केला आहे.
कोकण आणि सिंधुदुर्गमधील विकास खुंटल्याचा मुद्दा त्यांनी यावेळी उपस्थितांपुढे मांडत आगामी निवडणुकीत स्वाभिमान पक्षाचा विजय होईल, असा दावा राणेंनी केला. त्यामुळे त्यांचा हा दावा पाहता सत्ताधारी पक्षनेते त्यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
वैभववाडी तालुक्यातील स्वाभिमान पक्षाची पहिली जाहीर सभा माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीत पार पडली.
मुख्य म्हणजे राणे या सभेत कोणावर बरसणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं होतं. सदर सभेत नितेश राणे सभास्थळी नियोजनाचे कामकाज पाहत होते.