सोलापूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एक धक्कादायक निर्णय घेतला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची गाव ते राज्यपातळीपर्तंची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याची माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा सभा सोलापूर येथे झाली. यावेळी झालेल्या राज्य कार्यकारिणी बैठकीत ही घोषणा करण्यात आली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आज झाली. या बैठकीनंतर याची घोषणा करण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मोठ्या निर्णयानंतर आता विभागीय आणि राज्य पातळीवर शिस्तपालन समिती कार्यरत होणार आहे, तसे स्पष्ट करण्यात आले आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पुर्नबांधणी, अनेक पदाधिकाऱ्यांना बढती देणे किंवा नव्याने संघटनेत प्रवेश केलेल्यांना संधी देण्यासाठी कार्यकारिणी बरखास्तीचा निर्णय घेण्यात आल्याचे शेट्टी यांनी सांगितले.



स्वाभिमानी शेतकरी संघटनेची पुर्नबांधणीबाबत विचार करण्यात आला. संघटनेची कार्यकारिणी बरखास्त करून, महिनाभराच्या अगोदर नव्या निवडी जिल्हापातळीवर करायच्या आणि त्यानंतर पुढील महिनाभरात प्रदेशपातळवरील निवडी करायच्या आहेत. अशा प्रकारचा संघटना पुर्नबांधणीचा दोन महिन्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आल्याची शेट्टी यांच्याकडून माहिती देण्यात आली.


११ जानेवारीपर्यंत जिल्हा पातळीपर्यंतची संघटनेची बांधणी पूर्ण करायची, त्यानंतर ११ जानेवारी ते ११ फेब्रवारी या महिनाभराच्या कालावधीत प्रदेश पातळवरील बांधणी होईल. यानंतर राज्य कार्यकारिणीची पुन्हा बैठक घेऊन यांची निश्चिती होणार असल्याचे बैठकीत ठरले असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.