राजू शेटटी यांच्या आंदोलनाला हिंसक वळण, महावितरणचे कार्यालय पेटवले
Swabhimani Shetkari Sanghatana agitation in Kolhapur : महावितरण कार्यालयासमोर गेली दोन दिवस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे.
कोल्हापूर : Swabhimani Shetkari Sanghatana agitation in Kolhapur : महावितरण कार्यालयासमोर गेली दोन दिवस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरु आहे. माजी खासदार राजू शेटटी यांचे सुरू असलेल्या धरणे आंदोलनाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. ( Swabhimani Shetkari Sanghatana agitation in front of MSEDCL office for last two days in Kolhapur)
संतप्त अज्ञात शेतकऱ्यांनी कागल इथल्या महावितरणचे कार्यलय पेटवून दिले आहे.महावितरणचे कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय पेटवून लावण्यात आले आहे. छत्रपती शाहू साखर कारखान्याच्या अग्निशामक बंब आणून आग आटोक्यात आणण्याचा महावितरणने प्रयत्न केला. दरम्यान, आज दिवसभरात राज्यात आंदोलनाची भडका उडण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
शेतीला दिवसा सलग 10 तास वीजपुरवठा करावा, अन्यायी वीज बिल वसुली थांबवावी, शेतीपंपाची चुकीची वीज बिले तातडीने दुरूस्त करावीत या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कोल्हापूर महावितरण कंपनीच्या समोर बेमुदत धरणे आंदोलन सुरु केले आहे.
आंदोलनाचा काल दुसरा दिवस होता. स्वाभिमानी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे रात्रभर महावितरण कार्यालयासमोर झोपून होते. दरम्यान महावितरणला जागं करण्यासाठी मी कोल्हापुरात आंदोलन करतोय. तर स्वाभिमानीच्या इतर कार्यकर्त्यांनी आपल्या जिल्ह्यात महावितरण कार्यालयासमोर शांततेने आव्हान करावे, असे आवाहन राजू शेट्टी यांनी केले होते. मात्र, या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे.