सातारा : साखर पट्ट्यातील सर्व साखर कारखानदार परस्पर हंगाम सुरु करण्याच्या पवित्र्यात असतानाच साताऱ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. स्वाभिमानीच्या या भूमिकेमुळे ऊस दर आंदोलन तापलं आहे. सातारा जिल्ह्यातील सातारा,कराड, मसुर, शिवथर ,वडुज या ठिकाणी चक्का जाम आंदोलन करत स्वाभिमानीच्या वतीनं जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सातारा जिल्ह्यात अनेक दूध संघांनी बंद पाळून आंदोलनाला पाठिंबा दिला. तर अनेक गावात व्यवहार बंद ठेवून शेतकरी रस्त्यावर उतरले. सातारा शहरानजिक असलेला पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग देखील आंदोलकांनी अडवला. कराड - कोरेगाव राज्यमार्ग मसुर येथे अडवून चक्का जाम आंदोलन केले.


कराड जवळ पाचवड फाटा तेथे राष्ट्रीय महामार्ग अडवण्याचा प्रयत्न आंदोलकांनी केला. तर सातारा - पंढरपूर राज्य मार्ग कोरेगाव कुमठे येथे अडवून चक्का जाम आंदोलन करण्यात आले.