अश्विनी पवार, झी मीडिया, पुणे : लग्न म्हणजे एका सहजीवनाची सुरवात. मात्र पुण्यात एक असा अनोखा लग्नसोहळा पार पडला, जो केवळ सहजीवनाच्या प्रारंभापुरताच नव्हता, तर आईवडिलांची भेट घडणं हा त्यामागचा मुख्य हेतू होता.


(व्हिडिओ पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अस्सल मराठमोळ्या पद्धतीतलं हे लग्न होतं स्वीडनच्या जेसिका आणि ग्रेथम यांचं. स्वीडनमध्ये आपल्या सहजीवनाला सुरवात करणा-या या नवदाम्पत्यामधली वधू जेसिका ही मूळची भारतीय. लहानपणी मुंबईतल्या अनाथाश्रमातून स्वीडनच्या एका दाम्पत्यानं जेसिकाला दत्तक घेतलं. मात्र, आपल्या खऱ्या जन्मदात्यांचा शोध तीला पुन्हा भारतात घेऊन आला. 


गेले काही महिने शोध घेऊनही जेसिकाला आपले जन्मदाते काही सापडले नाहीत. तेव्हा आपल्या लग्नाला ते नक्की येतील या आशेनं तीनं पुण्यात आपल्या नव-याशी पुन्हा लग्न करण्याचा निर्णय घेतला. जेसिकाच्या इच्छेचा मान राखत, तिचा नवरा ग्रेथमनं तिला साथही दिली.


अगेन्स चाईल्ड ट्रॅफिकिंग या संस्थेच्या वतीनं हा विवाह अगदी थाटामाटात पार पडला. सनई चौघड्याचे सूर, मंगलाष्टक, वाजतगाजत आलेली वरात, व-हाडी मंडळींची लगबग असं अस्सल मराठमोळ्या वातावरणात जेसिका आणि ग्रेथम पुन्हा विवाहबंधनात अडकले. 


सर्वसामान्यपणे लग्न सोहळ्यात वधूच्या डोळ्यात नव्या आयुष्याचं स्वप्न असतं. मात्र, या लग्नसोहळ्यात नववधू जेसिकाचे डोळे सतत आपल्या आई वडिलांचा शोध घेत होते. तीचा हा शोध संपावा आणि तिला तिचे आईवडील भेटावेत याच तीला सदिच्छा.



पुणे । स्वीडनच्या जेसिका आणि ग्रेथम यांचे मराठमोळं अनोख लग्न