पुण्यात तरुणाचा तलावात बुडून मृत्यू
पुणे महापालिकेच्या जलतरण तलावात पोहोण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना
पुणे : महापालिकेच्या जलतरण तलावात पोहोण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना पुण्यात घडलीय. प्रफुल्ल वानखेडे असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. तो २१ वर्षांचा होता.दत्तवाडी परिसरात राहणारा प्रफुल्ल रविवारी सायंकाळी मित्रांसोबत तळजाई टेकडीवरील जलतरण तलावात पोहायला गेला होता. पोहोत असतानाच तो बुडाला. धक्कादायक बाब म्हणजे त्याठिकाणी जीवरक्षक तैनात असताना ही हा अपघात घडला.
त्यामुळे प्रफुल्लच्या मृत्यूस त्या ठिकाणचं व्यवस्थापन जबाबदार असल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केलाय. पोलीसही या बाबत तपास करत आहेत.