धक्कादायक! शासकीय जमिनीवर घेतलं २० लाखांचे कर्ज
चक्क बँकेचीच फसवणूक
बुलडाणा : शासकीय जमिनीला स्वत:ची जमीन दाखवत २० लाखांचे कर्ज घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माहिती अधिकार कार्यकर्ते रमेश रामभाऊ गवई यांनी तक्रार केल्यानंतर हे प्रकरण उघड झाले आहे. साखरखेर्डा येथील रवींद्र श्रीधर पाटील यांनी हे कर्ज घेतले आहे. पाटील हे शिवसेनेचे माजी सरपंच होते.
मार्च २०१० साली त्यांनी घेतलेली २० लाखांची रक्कम आता व्याजासह ६८ लाखांवर पोहोचली आहे. रविंद्र पाटील यांनी बनावट कागदपत्रे तयार करुन बुलडाणा अर्बन मल्टिस्टेटकडून कर्ज घेतल्याचे चौकशीअंती समोर आले आहे.