वसईत दवंडी पिटवून करवसुली
वसई विरार महानगर पालिकेचे कर्मचारी सध्या गल्लीबोळात दिवंडी पिटवण्याचे काम करत आहेत. अगदी ऐटीत घोड्यावर एक मावळा बसवून दवंडी पिटवत आहे. सध्या सर्वत्र मार्च एंडिंगचे वारे सर्वत्र वाहत आहेत. त्यामुळे महापालिकेने टॅक्सवसुली वर जोरदार भर दिला आहे.
वसई : वसई विरार महानगर पालिकेचे कर्मचारी सध्या गल्लीबोळात दिवंडी पिटवण्याचे काम करत आहेत. अगदी ऐटीत घोड्यावर एक मावळा बसवून दवंडी पिटवत आहे. सध्या सर्वत्र मार्च एंडिंगचे वारे सर्वत्र वाहत आहेत. त्यामुळे महापालिकेने टॅक्सवसुली वर जोरदार भर दिला आहे.
या आधी टॅक्स आणि पाणी पट्टी वसुलीसाठी सर्वत्र फलक ही लावले होते. सर्व इमारतींना नोटीसा हि दिल्या आहेत. मात्र या पुढे आता पारंपारिक पद्धतीने आता दवंडी देण्याचे सुरु केले आहे.
सध्या वसईच्या औद्यौगिक वसाहतीत अश्या प्रकारे दवंडी पिटवण्याचे काम सुरु आहे, आता लवकरच शहरातही हा दवंडीचा घोडा दौडणार आहे.
या मुळे टॅक्स वसुलीत चार दिवसात ५० लाखांहून अधिक वाढ झाल्याचं पालिकेने सांगितले आहे. या पद्धतीने कार धारकांना जागेवर टॅक्स पावती मिळत असल्याने लोक स्वत:हून पुढाकार घेत आपला टॅक्स भरणा करत आहेत.