पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील सुपली गावात गुरू शिष्य नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. शिक्षकानं विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नराधम शिक्षक नंदकुमार कोळवले हा विद्यार्थिनींशी गोड बोलत जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचा. याच पद्धतीने त्याने पीडित विद्यार्थिनीशी जवळीक साधली. शिक्षकाने या विद्यार्थिनीवर अत्याचार केले शिवाय विद्यार्थिनीसोबतचे फोटो समाजमाध्यमांमध्ये पसरवत बदनामी करण्याचा प्रयत्न केला.


या प्रकरणी नराधम शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल झालाय. मात्र अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही. 


दुसरीकडे पंढरपुरातीलच गार्डी गावात नराधम राहुल फाटे या नराधम शिक्षकाने पीडित विद्यार्थिनीला जवळ बोलावलं. मोबाईलमधील फोटो दाखवण्याच्या बहाण्याने नराधमाने विद्यार्थिनीवर अत्याचार करण्याचे प्रयत्न केले आहेत. पंढरपुरात एकाच दिवशी 2 घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.