COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विष्णू बुरगे, झी मीडिया, बीड : आज शिक्षक दिनी सर्व समाजातील स्तरातून शिक्षकांचा सन्मान होतोय. त्यांच्याप्रती आदर, कृतज्ञता व्यक्त होतेय. पण विनाअनुदानित शिक्षकांच्या बाबतीत मात्र चित्र उलट आहे. कामाच्या मोबदल्यासाठी त्यांना झगडाव लागत आहे. बीडमधील अशा नाराज शिक्षकांनी आज काळा शिक्षक दिन साजरा केला.


बीडमध्ये मागील अनेक वर्षांपासून विनाअनुदानित शिक्षक विनावेतन काम करत आहेत. आपल्याला पगार मिळावा या मागणीसाठी त्यांनी अनेक वेळा आंदोलनं केली. मागच्या वर्षी तसा जीआरही निघाला मात्र त्याचं पुढे काय झालं ? असा प्रश्न या शिक्षकांनी उपस्थित केलाय. एक वर्षभरापूर्वी जिआर आला मात्र अद्याप पर्यंत कुठलीही कार्यवाही सरकारकडून केली जात नाही.



त्यामुळे संतप्त झालेल्या शिक्षकांनी शिक्षक दिना दिवशी आजचा दिवस काळा दिवस म्हणून साजरा केला. यावेळी  शिक्षकांनी हाताला काळ्या फीती लावून आणि काही शिक्षकांनी काळे कपड़े परिधान केले. 


जीआरची अद्यापही अंमलबजावणी झाली नसल्याने संतप्त शिक्षकांनी आज हे आंदोलन केले. यावेळी शिक्षकांनी जोरदार घोषणाबाजी करत सरकारचा विरोध केलाय.