Marathwada Teachers: विद्यार्थ्यांच्या आधी शिक्षकांची परीक्षा; कधी ? कुठे ? का ?
Marathwada Teachers: मराठवाड्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना आता परीक्षा द्यावी लागणार आहे. शिक्षकांचे मूल्यांकन आणि बुद्ध्यांक (Intelligence quotient) जाणून घेण्यासाठी एप्रिल 2023 पर्यंत मराठवाड्यातील सर्व जिल्हा परिषद शाळेत ही परीक्षा घेण्यात येणार आहे.
विशाल करोळे, झी मीडिया, संभाजीनगर: मराठवाड्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना आता परीक्षा द्यावी लागणार आहे. शिक्षकांचे मूल्यांकन आणि बुद्ध्यांक (Intelligence quotient) जाणून घेण्यासाठी एप्रिल 2023 पर्यंत मराठवाड्यातील सर्व जिल्हा परिषद शाळेत ही परीक्षा घेण्यात येणार आहे. विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. मराठवाड्यातील (marathwada) 10 हजार जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना आता परीक्षा द्यावी लागणार आहे. झेड पी शाळेतील 10 हजार शाळांच्या गुरुजींची परीक्षा होणार आहे. हा मराठवाडा विभागीय आयुक्तांचा निर्णय असून विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे. मराठवाड्यात दहा हजारावर जिल्हा परिषद शाळा आहे आणि 35000 च्या आसपास शिक्षक आहेत. या सगळ्यांसाठी ही परीक्षा राबवण्यात येणार आहे. लातूरमध्ये प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग केला होता आणि त्यानंतर आता हा पथदर्शी प्रकल्प म्हणून संपूर्ण मराठवाड्यात राबविण्यात येणार आहे. (Teachers Evaluation and Student IQ Test Exam will be conducted by Zilla Parishad School Marathwada in 2023)
शिक्षकांचे मूल्यांकन आणि बुद्ध्यांक जाणून घेण्यासाठी एप्रिल 2023 पर्यंत मराठवाड्यातील सर्व जिल्हा परिषद शाळेत ही परीक्षा घेण्यात येणार आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी हा या मागचा प्रमुख हेतू आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये मुलांचं गणित, इंग्रजी (english) कच्च आहे अशा पद्धतीचा एक रिपोर्ट आला आहे त्यामुळे आता शिक्षकांचाही मूल्यांकन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यातून दर्जा सुधारेल असा प्रशासनाला विश्वास आहे.
हेही वाचा - धोका! या चोरांची अक्कल आणि कृती वाचून तुम्हीही तडक व्हाल सावध
कशी असेल परीक्षा?
संपूर्ण मराठवाड्यात विद्यार्थी आणि शिक्षक बेस लाइन असेसमेंट करण्यात येईल. पाहिली ते आठवी च्या विद्यार्थ्यांची आजपर्यंतची परिस्थिती आणि चार महिन्यानंतरचा मूल्यांकन याचा सगळ्यांचा अभ्यास करण्यात येईल ऑनलाइन ॲपच्या माध्यमातून शिक्षक आणि विद्यार्थी यांचं ट्रेकिंग करण्यात येईल. परीक्षेत मूल्य शिक्षणावर फोकस करण्यात येईल सोबतच शाळेत उपलब्ध असणारी लायब्ररी, लॅबोरेटरी कॉम्प्युटर लॅब (compute lab) या सगळ्यांचा परीक्षेत प्रभावी वापर करण्यात येईल. या सगळ्यांचा वापर करून शिक्षकांची परीक्षा टप्प्याटप्प्याने घेण्यातील आणि त्यांचा मूल्यमापन करण्यात येईल आणि विद्यार्थ्यांच्या उत्कर्षासाठी काय गरज आहे याचं ट्रेनिंग शिक्षकांना देण्यात येईल.
लातूरचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी हा उपक्रम प्रथमतः लातूरमध्ये सुरू केला होता आता त्याची अंमलबजावणी मराठवाड्यात होणार आहे. दरम्यान या परीक्षा घेण्याच्या पद्धती ला शिक्षकांचा मात्र विरोध आहे नोकरीवर घेताना शिक्षकांचा मूल्यमापन केलं जातं मग आता पुन्हा मूल्यमापन (value education) करण्याची गरज काय असा सवाल शिक्षक संघटनांनी विचारला आहे. शिक्षणात काही बदल करायचा म्हटलं की शिक्षण संघटनांकडून विरोध होतो तर प्रशासनिक पातळीवरही नंतर घेतलेला निर्णय मागे घेण्यात येतो अनेकदा याचे उदाहरण पाहिले आहे.. मात्र आता हा निर्णय घेतला आहे आणि परीक्षा घेणार असा प्रशासन म्हणतंय. सुरुवातीला फक्त जिल्हा परिषद शाळांसाठी असणार हा निर्णय नंतर विनाअनुदानित शाळा आणि महानगरपालिकांमध्ये सुद्धा राबवण्याचा प्रशासनाचा विचार आहे मात्र यातून पुन्हा एकदा प्रशासन आणि शिक्षक संघटना आमने-सामने येण्याची शक्यता आहे