तेजस एक्सप्रेसच्या फेऱ्या वाढल्या...
तेजस एक्स्प्रेस 1 नोव्हेंबरपासून आठवड्यातून तीनऐवजी पाच दिवस धावणार आहे.
कोकण रेल्वेमार्गावर पाच महिन्यांपूर्वी सुरू झालेली ‘हायटेक’ आणि सेमी हायस्पीड वातानुकूलीत तेजस एक्स्प्रेस 1 नोव्हेंबरपासून आठवड्यातून तीनऐवजी पाच दिवस धावणार आहे. यामुळे कोकणात येणार्या पर्यटकांसह कोकणवासियांचा प्रवास आणखी सुखकर होण्यास मदत होणार आहे. मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून गोव्यातील करमाळीदरम्यान याच वर्षी बावीस मे रोजी ही एक्स्प्रेस सुरू करण्यात आली होती. कोकण रेल्वेच्या पावसाळी वेळापत्रकानुसार ही आलिशान वातानुकूलीत रेल्वेगाडी आठवड्यातून तीन दिवस धावत होती. आता नवीन वेळापत्रकानुसार तेजस एक्स्प्रेस आठवड्यातील मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवारी धावणार आहे.