Mahavikas Aghadi : उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघात काँग्रेस उमेदवार आयात करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. शिवसेना ठाकरे पक्षासोबत असलेल्या तेजस्वी घोसाळकर या काँग्रेसच्या पंजा या चिन्हावर लोकसभा निवडणूक लढवू शकतात. अनेक ठिकाणी उमेदवारांवरुन  महाविकास आघाडीत मोठा गोंधळ सुरु आहे. अशातच आता नवी फॉर्म्युला पहायला मिळत आहे. महाविकास आघाडीचे घटक पक्ष एकेमकांचे उमेदवार आयात करत आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरे आणि शिवसेना ठाकरे पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा करून याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचंही सूत्रांकडून कळतय. तेजस्वी घोसाळकर या शिवसेना ठाकरे पक्षाच्या संभाव्य उमेदवार होत्या. चांगला संपर्क असल्याने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


कोण आहेत  तेजस्वी घोसाळकर?


तेजस्वी घोसाळकर या दिवंगत  अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी आहेत.अभिषेक घोसाळकर हे ठाकरे गटाचे दहिसरमधले माजी नगरसेवक होते. काही महिन्यांपूर्वी अभिषेक घोसाळकरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मॉरिस भाई नावाच्या आरोपीने अभिषेक घोसाळकर यांच्यावर 5 गोळ्या झाडल्या. गंभीर जखमी अवस्थेतल्या अभिषेक घोसाळकरांना दहिसरच्या करुणा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्यांचा मृत्यू झाला.. तर त्यांच्यावर गोळ्या झाडणा-या मॉरिस नोरोन्हा यानंही स्वतःवर गोळ्या झाडून घेऊन आत्महत्या केली.. धक्कादायक बाब म्हणजे मॉरिस भाई आणि अभिषेक घोसाळकर हे फेसबुक लाईव्ह करत होते. फेसबुक लाईव्ह झाल्यानंतर मॉरिसनं अभिषेक घोसाळकरांवर अगदी जवळून गोळ्या झाडल्या. यानंतर ठाकरे कुटुंबानं घोसाळकरांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केलं. उद्धव ठाकरे, रश्मी ठकरे आणि आदित्य ठाकरेंसह संजय राऊत, अनिल परब आणि सुनील प्रभू हे नेतेही उपस्थित होते.