विशाल करोळे, औरंगाबाद : तुम्ही घरात कुत्रा पाळला असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण कुत्र्यांना सध्या एक डेंजर आजार होतोय. या आजारात कुत्र्यांचा तडफडून मृत्यू होतो. पण त्यामुळं घरातल्या मुलांनाही त्रास होऊ शकतो. नेमका काय आहे हा डेंजर आजार?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्या कोरोना महामारीनं जग त्रासलं आहे. पक्ष्यांवरही बर्ड फ्लूची संक्रांत आली आहे आता कुत्रे सुद्धा पार्वो नावाच्या डेंजर आजारानं मृत्यूमुखी पडत आहेत. औरंगाबादच्या पशू चिकित्सालयात येणा-या 100 कुत्र्यांपैकी जवळपास 60 कुत्र्यांमध्ये पार्वो आजाराची लागण झालेली दिसते आहे.


काय आहे पार्वो आजार? 


पार्वो हा व्हायरल आजार आहे
त्यात कुत्र्यांना उलटी, विष्ठेतून रक्तस्त्राव होतो
थेंबभर पाणी पाजलं तरी असह्य वेदना होतात
हृदय विकाराच्या झटक्यानं कुत्रे तडफडून मरतात
आजारी कुत्र्याच्या उलटी आणि शौचातून विषाणू पसरतात
घरातील लहान मुलांनाही त्यामुळं संसर्ग होऊ शकतो


लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी भूतदया दाखवत रस्त्यावरची कुत्री दत्तक घेतली. पण कुत्री दत्तक घेणाऱ्यांना या आजाराची माहिती नसल्यानं आजार बळावतो... त्यावर लस उपलब्ध आहे, मात्र कुत्र्यांचं वेळेत लसीकरण होणं गरजेचं आहे.


गेल्या महिनाभरात या आजारानं चांगलंच थैमान घातलं आहे. त्याशिवाय कॅनाईनं डिस्टेंपर या अर्धांगवायूचा आजारही कुत्र्यांमध्ये वाढला आहे.. त्यामुळं तुमच्या घरातल्या लाडक्या कुत्र्यांना सांभाळताना घरातील लहानग्यांचं आरोग्य धोक्यात येणार नाही ना, याचीही विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.