Thackeray group MLA Bhaskar Jadhav's Chiplun house attacked by unknown persons : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांच्या रत्नागिरीतील चिपळूण येथील राहत्या घरावर अज्ञातांकडून हल्ला करण्यात आला आहे. भास्कर जाधव यांच्या बंगल्यावर दगड, पेट्रोलच्या बाटल्या आणि स्टम्प्स फेकून मारले आहेत. अज्ञाताने हा हल्ला केल्याचे दिसून येत आहे. मात्र हल्ल्याचे नेमकं कारण पुढे आलेले नाही.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोकणात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहे.  त्यातच आता आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूणच्या घरावर अज्ञातांकडून हल्ला करण्यात आल्याने राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता आहे. याआधी भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) आणि राणे कुटुंबात (Rane Family) वैयक्तिक पातळीवर आरोप-प्रत्यारोप केले होते. त्यातच  शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे (Thackeray group) आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांना एसीबीने चौकशीची नोटीस बजावली आहे. त्यामुळे राणे विरुद्ध ठाकरे गट संघर्ष आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे.


दरम्यान, शिवसेना आमदार वैभव नाईक यांना बजावण्यात आलेल्या नोटिसीविरोधात शिवसेना ठाकरे गटाने मोर्चा आयोजित केला होता. यावेळी बोलताना भास्कर जाधव यांनी राणे कुटुंबावर जहरी टीका केली होती. तसेच नीलेश राणे यांनी केलेल्या टीकेलाही उत्तर दिले. त्याआधी राणे यांनी टीका केली होती. सत्ता गेल्याने मविआचे (Mahavikas Aghadi) नेते बेरोजगार झाले आहेत, त्यांच्याकडे काही कामधंदे उरले नाहीत, दिवसभर भाजप (BJP) काय काय करतं याकडे त्यांचं लक्ष असतं अशी टीका भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी केली. तसंच भास्कर जाधव कार्टून आहे, तळ कोकणात आम्ही त्याला बैल म्हणतो, तो उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) खुश करण्यासाठी बोलत असल्याची बोचरी टीकाही निलेश राणे यांनी केली होती.