Maharashtra Politics : आगामी निवडणुकांच्या तोंडावर राज्याच्या राजकारणात नाट्यमय घडामोडी घडत आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाववरुन खलबत सुरु आहेत. भाजप आणि मनचे यांच्यात युती बाबत चर्चा होत आहे. अशातच आता ठाकरे गट भाजपसोबत पुन्हा जुळवून घेणार  असल्याची चर्चा रगंली आहे.  शिवसेना प्रवक्ते आणि शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी ठाकरे गट आणि भाजप एकत्र येण्याबाबत खळबळजनक दावा केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे आणि रश्मी उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली असल्याचा दावा  शिवसेना प्रवक्ते आणि शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांची केला आहे. काही प्रसिद्धी माध्यमांनी अशा प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध केल्याचे म्हणत दिपक केसरकर यांनी हा दावा केला आहे.  


शिवसेना ठाकरे गट पुन्हा एकदा भाजपसोबत आला तर काय होईल?


शिवसेना ठाकरे गट पुन्हा एकदा भाजप सोबत NDA आघाडीत आला तर राज्यातील राजकिय समिकरणं बदलणार आहेत. शिवसेना ठाकरे गट भाजप सोबत आला तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा भूमीका काय रहाणार? पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सोबत बैठक होत आहे. या बैठकीत महाविकास आघाडीचा घटस्फोट होणार का? वंचित बहुजन आघाडी चे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीत ठाकरे गटाच्या याच भूमीकेवरून प्रश्नं चिन्हं  उपस्थित केल्याची माहीती दिपक केसरकर यांनी दिली आहे.


आघाडीतून बाहेर पडून भाजपसोबत हातमिळवणी करणार होते


यापूर्वी देखील केसरकर यांनी ठाकरेंवर असा प्रकराचे आरोप केले होते. उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीतून बाहेर पडून भाजपसोबत हातमिळवणी करणार होते असा गौप्यस्फोट दीपक केसरकर यांनी केला होता. त्यांनी माझ्याद्वारे पंतप्रधान मोदींना अधिक वेळ मागण्यासाठी निरोप पाठवण्याची व्यवस्था केली होती असा गौप्यस्फोट केसरकरांनी केला होता. 


मंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंना एक कोटी रुपयांचा चेक दिला होता


मंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंना एक कोटी रुपयांचा चेक दिला होता असा खळबळजनक गौप्यस्फोट, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केला होता. त्यानंतर ठाकरेंनी आणखी पैसे मागितले, मात्र ते आपण न दिल्यानं आपलं मंत्रिपद हुकलं असा गंभीर आरोप केसरकरांनी केला होता. 


युती तोडणरा मुख्य व्हिलन संजय राऊत ...


ठाकरे यांच्याकडून  पुन्हा जुळवून घेण्यासाठी  प्रयत्न सुरू आहेत. ठाकरे यांनी काही केलं तरी पुन्हा मोदीजी यांना उभे करणार नाही. युती तोडणरा मुख्य व्हिलन संजय राऊत आहे असा आरोप देखील दिपक केसरकर यांनी केला.