Thackeray vs Shinde : ठाकरे गटाचे वकील बाजू मांडणार तर दुपारनंतर शिंदे गटाचा युक्तिवाद
Maharashtra Politics : राज्यातल्या सत्तासंघर्षातील विविध याचिकांवर सुप्रीम कोर्टात कालपासून सुनावणी सुरु आहे. (Maharashtra Political News) तीन दिवस याचिकेवर सुनावणी होणार आहे.
Maharashtra Politics : राज्यातल्या सत्तासंघर्षातील विविध याचिकांवर सुप्रीम कोर्टात कालपासून सुनावणी सुरु आहे. (Maharashtra Political News) तीन दिवस याचिकेवर सुनावणी होणार आहे. त्यानंतर कोर्टाकडून निर्णय अपेक्षित आहे. आजही ठाकरे गटाचे वकील बाजू मांडणार आहेत. त्यानंतर दुपारी जेवणाच्या सुट्टीनंतर शिंदे गटाचे वकील युक्तिवाद करणार आहेत. ( Thackeray vs Shinde )
ठाकरे गटाकडून कपिल सिब्बल यांनी पहिल्या दिवशी शिंदे गटावर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित करत थेट राज्य सरकारबाबत महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला. विधानसभा अध्यक्षांचे अधिकार, पक्ष म्हणून शिवसेनेचे अधिकार, पक्षाध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरेंचं अधिकार, एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासमवेत शिंदे गटातील आमदारांची बंडखोरी, त्याची वैधता अशा अनेक मुद्द्यांवर ऊहापोह करण्यात आला. विधिमंडळ पक्ष महत्त्वाचा की राजकीय पक्ष यावर काल कोर्टात घमासान चर्चा झाली.
केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधात आज सुनावणी
केंद्रीय निवडणूक आयोगाविरोधातल्या ठाकरे गटाच्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. या याचिकेवर वेगळ्या बेंचपुढे सुनावणी घेण्याची ठाकरे गटाची मागणी सुप्रीम कोर्टाने मान्य केलीय. ही सुनावणी सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील 3 न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर होणार आहे. ठाकरे गटाने ही सुनावणी 5 न्यायाधीशांच्या घटनापीठापुढे घेण्याची विनंती केली होती. मात्र घटनापीठाऐवजी खंडपीठासमोर ही सुनावणी होईल.