Thackeray vs Shinde : शिंदे गटाने कितीही केलं तरी ठाकरे गटाच्या `या` आमदाराला व्हिप लागू होणार नाही
Maharashtra Political Crisis : शिवसेना नाव (Shiv Sena) आणि चिन्ह धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर आता शिंदे गट अॅक्शनमोडमध्ये आला आहे. ठाकरे गटाची (Thackeray Group) कोंडी करण्यासाठी व्युहरचना करीत आहे.
Maharashtra Political Crisis : शिवसेना नाव (Shiv Sena) आणि चिन्ह धनुष्यबाण चिन्ह मिळाल्यानंतर आता शिंदे गट अॅक्शनमोडमध्ये आला आहे. ठाकरे गटाची (Thackeray Group) कोंडी करण्यासाठी व्युहरचना करीत आहे. मात्र, ठाकरे गटाचा एक आमदार त्यांना भारी पडणार आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात व्हिप लागू करुन शिंदे गट ठाकरे गटाची कोंडी करण्याची शक्यता आहे. ( Shiv Sena Crisis) मात्र ठाकरे गटाच्या एका आमदाराला हा व्हिप लागू होणार नाही. (Maharashtra Political News)
Thackeray Vs Shinde LIVE Updates : ठाकरे विरुद्ध शिंदे सेना वाद, आज पुन्हा सुनावणी
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. 40 आमदार शिवसेनेतून बाहेर पडलेत. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे गट आक्रमक होत थेट शिवसेनेवर दावा केला. त्यानंतर निवडणूक आयोगात हे प्रकरण गेल्यानंतर निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवले आणि ठाकरे गट आणि शिंदे गटाला स्वतंत्र पक्ष आणि चिन्ह दिले. त्यानंतर सत्तासंघर्षाचा खटला हा सुप्रीम कोर्टात सुरु झाला. त्याचदरम्यान, अचानक निवडणूक आयोगाने शिंदे गटाला शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह दिले. त्यामुळे आता शिवसेना ही शिंदे गटाची झाली आहे.
Eknath Shinde : आता शिंदे गट अॅक्शनमोडमध्ये, नवीन राष्ट्रीय कार्यकारणीत कोण असणार?
मात्र, निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष म्हणून मान्यता दिली. शिंदे आणि ठाकरे गटात फूट पडल्यानंतर अंधेरीची पोटनिवडणूक झाली होती. तेव्हा निवडणूक आयोगानं उद्धव बाळासाहेब ठाकरे हे पक्षाचं नाव दिलं होतं. तर मशाल हे चिन्ह देण्यात आलं होते. अंधेरी पोटनिवडणुकीत विजयी ठरलेल्या ऋतुजा लटके (Rituja Latek) या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या आहेत. त्यामुळे ऋतुजा लटके यांना शिंदे गटाचा व्हिप लागू होणार नाही.
दरम्यान, महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षांवर सुप्रीम कोर्टात आजपासून सलग 3 दिवस सुनावणी होणार आहे. हे प्रकरण 7 न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे सोपवायचं की 5 न्यायाधीशांकडेच ठेवायचं याचा निर्णयही मेरिटनुसार घेतला जाणार असल्याचं कोर्टानं स्पष्ट केलंय. आता 3 दिवसांच्या सुनावणीत ते ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सुनावणीकडे सर्वांचं लक्ष लागले आहे. आज 16 आमदार अपात्र होणार का, याची उत्सुकत आहे.