आज मध्यरात्री बारापासून मुंब्रा बायपास वाहतूक २ महिन्यांसाठी बंद
वाहन चालकांकडून ऐरोली किंवा आनंदनगर जकात या दोन टोलनाक्यापैंकी एकाच नाक्यावरून टोल वसूल करावा अशा सूचना दिल्याची अशी माहिती सार्वजनिक बांधकाम (महामंडळ) मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
ठाणे: मुंब्रा बायपास मार्गावरून वाहतूक आणि ये जा करणारे प्रवासी आणि वाहन चालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आज (सोमवार, ७ मे) मध्यरात्री १२ वाजलेपासून ठाण्यातल्या मुंब्रा बायपासची वाहतूक बंद होणार आहे. दुरुस्तीच्या कामानिमित्त मुंब्रा बायपास बंद ठेवण्यात येणार आहे. दुरुस्तीचं हे काम दोन महिने चालणार आहे. प्रत्यक्षात दुरुस्तीचं हे काम १६ एप्रिलला सुरू होणार होतं. मात्र अधिसूचनेचं काम बाकी असल्यामुळं हे काम दरम्यानच्या काळात रेंगाळलं होतं. आता मंगळवारपासून हे दुरुस्तीचं काम सुरु होणार आहे.
मंगळवारपासून दोन महिन्यांसाठी मुंब्रा बायपास बंद
मुंब्रा बायपास रस्ता येत्या मंगळवारपासून तब्बल दोन महिन्यार्पयत बंद राहणार आहे. त्याच्या दुरुस्तीच्या कामाला अखेर पनेवल सार्वजनिक बांधकाम विभागाने मुहूर्त काढल्यानंतर ठाणो शहर वाहतूक शाखेने त्यासाठी पूर्ण तयारी केली आहे. याचा परिणाम ठाणो आणि नवी मुंबईच्या वाहतुकीवर होण्याची शक्यता असल्याने जेएनपीटी येथून निघणाऱ्या 1क्क् टक्के वाहतुकीपैकी 8क् टक्के वाहतूक तेथेच थांबवली जाणार आहे. 2क् टक्के वाहतूक या कालावधीत सोडली जाणार आहे. तसेच दुरूस्ती कामामुळे वाहतूक मार्गात केलेल्या बदलांमुळे वाहनचालकांमध्ये गोंधळ होऊ नये,यासाठी माहिती पत्रके आणि टोकनचे वाटप जेएनपीटीकडून वाहन चालकांना केले जाणार असून यामध्ये वाहतुकीचा मार्ग, वाहतुकीची वेळ अशी माहिती असणार आहे. दरम्यान,टोकनवर दिलेल्या वेळेचे पालन न करण्यावर कारवाई केली जाणारअसल्याची माहिती ठाणो वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी गुरूवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
मुंब्रा बायपास संदर्भात आता वाहतूक शाखेच्या अधिकाऱ्यांनी सर्व पर्यायी मार्गाचा अभ्यास केला असून आता येत्या २४ एप्रिलपासून या कामाला सुरुवात होणार आहे. तब्बल २ महिने हे काम सुरू राहणार असून त्यासाठी मुंब्रा बायपास पूर्णत: वाहतुकीसाठी बंद राहणार आहे. त्याच्या दुरुस्तीमध्ये रेल्वेच्या उड्डाणपुलाचे बांधकाम, बेअरिंग मजबूत करणो आणि बदलणो, काही डेस्कलॅब तोडून नवीन बांधणो ही कामे केली जाणार आहेत. हा रास्ता मुख्यत: जेएनपीटी कडून येणा:या आणि जाणा:या अवजड वाहतुकीसाठी वापरला जातो. सोबत ठाणो,कल्याण-डोंबिवली,नवी मुंबई, भिवंडी आणि मुंबईला जाण्यासाठी देखील चार चाकी आणि दुचाकी वाहन चालक याचा वापर करतात. या सर्वांना २ महिने याचा फटका बसणार आहे. त्यामुळे वाहतूक विभागाने वेगवेगळ्या मार्गावरून ही वाहने वळवली आहेत. मुंब्रा वाय जंक्शन ते रेतीबंदर असे ७ किलो मीटर रस्त्यांचे काम करण्यात येणार आहे. केवळ लहान वाहनांना मुंब्रा शहरातून प्रवेश दिला जाणार असून मुंब्रा बायपासवर केवळ बायपासच्या कामाच्या संदर्भातील गाडय़ांना सोडले जाणार आहे, त्यांना विशेष मार्किग केले जाणार आहे याशिवाय जीवनावश्यक वस्तू घेऊन जाणा:या अवजड वाहनांना शहरातून सोडले जाणार आहे . ठाणो आणि नवी मुंबईचा वाहतुकीचा भार कसा कमी होईल, यादृष्टीने विशेष लक्ष दिले जाणार असल्याचे उपायुक्त काळे यांनी सांगितले.
एकच टोल भरावा लागणार-पालकमंत्री
मुंब्रा बायपासच्या दुरुस्तीच्या कामामुळे वाहतुकीत बदल केला आहे. त्यामुळे वाहनचालकांना नाहक दोन टोल भरण्याची वेळ ओढवली आहे. मात्र, ती वेळ येणार नसल्याचे स्पष्ट करून वाहन चालकांकडून ऐरोली किंवा आनंदनगर जकात या दोन टोलनाक्यापैंकी एकाच नाक्यावरून टोल वसूल करावा अशा सूचना दिल्याची अशी माहिती सार्वजनिक बांधकाम (महामंडळ) मंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
२४ तास काम राहणार सरू
मुंब्रा बायपासच्या कामाला दोन महिन्याचा कालावधी लागणार असून ते पूर्ण करण्यासाठी २ तास काम करण्यात येणार आहे. यामध्ये डेस्कलॅब तोडून नवीन बांधणो आणि बेअरिंगचे काम करण्यात येणार आहे पावसापूर्वी हे काम संपवावे अशा सूचना पनवेल सार्वजनिक बांधकाम विभागाला दिल्या आहेत.
पोलीसांकडून फौजफाटा तैनात
या कामाच्या दरम्यान,वाहतुक सुरळीत राहण्यासाठी वाहतुक पोलिसांसह वॉर्डन अशी 3क्क् पेक्षा अधिक जणांचा फौजफाटा तैनात केला जाणार आहे. गरज भरल्यास अतिरिक्त मनुष्यबळ वाढवण्यात येणार असल्याचे उपायुक्त काळे यांनी सांगितले.
बंद पडणारी वाहने तत्काळ हलवणार
कामादरम्यान, एखादे वाहन बंद पडल्यास त्याला दहा मिनीटात हटवण्याचे नियोजन वाहतूक शाखेने केले आहे. त्यासाठी त्यांनी काही विशेष ठिकाणो निश्चित केले असून तेथे 4 मोठय़ा तर 28 छोटय़ा क्रेन सज्ज ठेवल्या आहेत.तसेच मुंब्य्रासाठी ठामपाकडे एक मोठी क्रेन मिळावी, अशी मागणी केली आहे. तसेच या काळावधीत रस्त्यांवर धावणारे वाहन बंद पडू नये यासाठी त्याची तपासणी करूनच ते रस्त्यावर उतरावे.याची काळजी घ्यावी अशी सूचना वाहतूक असोसिएशनला केल्याचे काळे यांनी सांगितले.