ठाणे : ठाणे आणि पालघर जिल्यातील सर्व तालुके दुष्काळग्रस्त जाहीर करावेत अशी मागणी कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील यांनी केलीय.  कोकणातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट क्विंटलमागे साडे तीन हजार रुपये दर द्यावा अशीही कुणबीसेनेची मागणी आहे. कुणबी सेना प्रमुख विश्वनाथ पाटील यांच्या नेतृत्वाखाली किसान आक्रोश यात्रेला विक्रमगडच्या तहसिलदार कार्यालयापासुन सुरुवात झालीय़.


किसान आक्रोष यात्रा


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संपुर्ण महाराष्ट्रभर दोन महिन्याच्या कालावधीत शेती बचाव आंदोलन आणि किसान आक्रोष यात्रा काढण्यात येईल असं पाटील यांनी यावेळी म्हटलंयय.


विक्रमगड तालुक्यातुन सुरू झालेली ही किसान आक्रोश यात्रा वाडा,ठाणे, रायगड,रत्नागिरी जिल्ह्यात प्रवास करणार आहे.