ठाणे : ठाण्यातील इंदिरा नगर परिसरात सीएनजी सिलिंडरचा भडका होऊन लागलेल्या आगीत ९ जण जखमी झालेत. त्यापैकी सहाजण गंभीर आहे. इंदिरा नगर रोड क्रमांक १६ इथं  लादी बसवण्याचे काम सुरु होते. त्यावेळी बाजूला ठेवण्यात आलेल्या जुन्या एलपीजी गॅसची गळती झाली. त्यामुळे सीएनजी सिलेंडरचा भडका उडाला.


नव्वद टक्के भाजले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी लागलेल्या आगीत मोहम्मद खान पाच टक्के भाजलेत. तर एकाच कुटुंबातील गोमती शर्मा, कमलावती गोमती शर्मा, नारायण गोमती शर्मा आणि शिवा गोमती शर्मा हे नव्वद टक्के भाजलेत. या सगळ्यांवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 


उपचारासाठी रुग्णालयात


 या घटनेत  किरकोळ जखमी झालेले बळीराम भंडारे  यांना सिव्हील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलंय. कल्पेश रेडेकर, आदित्या लहाने, शमशाद सिद्धिकी हेसुद्धा किरकोळ जखमी झालेत.  जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली.