चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, बदलापूर: यंदा लांबलेल्या पावसामुळे नोव्हेंबर (november) अखेरीस पुणे जिल्ह्यातील आंध्रा आणि एमआयडीसीच्या बारवी धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे पुढील वर्षी 15 जुलैपर्यंत ठाणे जिल्ह्यातील सर्व शहरांना कोणतीही कपात केली जाणार नसल्याचे  पाटबंधारे विभागाच्या वतीने सांगण्यात आले आहे. जिल्ह्यातील शहरांना मुरबाड तालुक्यातील ‘एमआयडीसी’चे बारवी धरण (barwi dam) आणि पुणे जिल्ह्यातील लोणावळ्याजवळील टाटा कंपनीच्या आंध्रा धरणातून पाणी पुरवठा होतो. सर्वसाधारपणे 15 ऑक्टोबर ते 15 जुलै याकाळात धरणातील पाण्याचे नियोजन पाटबंधारे विभाग करीत असते. (thane news a dam near thane filled with water good news for citizens)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दोन्ही धरणांमध्ये मिळून 15 जुलैपर्यंत 534.47 दशलक्ष घनमिटर दशलक्ष घनमिटर वापरता येण्याजोगे पाणी शिल्लक राहणार आहे. शहरांचा प्रतिदिन पाणी पुरवठा आणि सिंचन दोन्ही मिळून 477.72 दशलक्ष घनमिटर पाण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे यंदा पाणी कपातीची गरज लागणार नाही. त्यामुळे ठाणे जिल्ह्यातील नागरिकांसाठी ही एक  समाधान देणारी बातमी आहे. 


हेही वाचा - सकाळी उठल्यानंतर 'ही' काम केल्यास लक्ष्मी देवी राहतील प्रसन्न; जाणून घ्या


मुंबईत पाणी कपातीचं सावट 


अनेकदा मुंबईतही पाणी कपातीचे संकट उद्भवले आहे त्यामुळे यंदाही हे संकट काही कमी झालेले नाही. काही दिवसांपूर्वी मुंबईकरांनाही पाणी कपातीचा सामना करावा लागला होता. दुरुस्तीच्या कामासाठी मुंबईतील अनेक भागांचा पाणी पुरवठा 24 तास बंद (water cut in mumbai) राहिला होता. या भागांमध्ये 29 नोव्हेंबर म्हणजे मंगळवारी सकाळी 8.30 वाजल्यापासून ते 30 नोव्हेंबर म्हणजेच बुधवारी सकाळी 8.30 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद होता, त्यामुळे नागरिकांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन करण्यात येत आहे. 


बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार, पवई आणि वेरावली दरम्यान पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनची दुरुस्ती करण्यात येणार होती. पवईतील 300 मिमी पाइपलाइन तसेच पाण्याचा प्रचंड दाब असलेल्या 1800 मिमी पाईपलाईनची दुरुस्ती करण्यात येणार होती. पाणी गळती रोखण्यासह इतर महत्वाची कामं देखील या वेळेमध्ये करण्यात येणार होती त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे आणि पाण्याचा जपून वापर करावा असे आवाहन बीएमसीकडून करण्यात आले होते.