ठाणे : मुंबईला लागूनच असलेल्या ठाण्यातील कौसा परिसरात सोमवारी स्फोटकांचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पोलिसांनी केलेल्या कारवाईत स्फोटकांचा साठा जप्त केला असून या प्रकरणी तीन जणांना ताब्यात घेतले आहे. ठाणे पोलीस, लोहमार्ग पोलीस आणि एटीएस म्हणजेच दहशतवाद विरोधी पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली आहे.


पोलिसांनी जप्त केलेल्या स्फोटकांच्या साठ्यात ९ डिटोनेटर्स, १० किलो अमोनिअम नायट्रेट आणि क्रुड बॉम्ब तयार करण्यासाठी वापरण्यात येणा-या घातक पदार्थांचा समावेश आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.



पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु आहे. दरम्यान, एप्रिल महिन्यात उत्तर प्रदेशातील एटीएसच्या टीमने मुंब्र्यातून संशयित दहशतवाद्यांनाही अटक केलं होतं.