ठाणे : माहिती अधिकाऱ्याच्या नावाखाली खंडणीची वसुली करण्याचा धंदा ठाणे शहरात सुरु होता. भाजपचा विद्यमान नेता आणि माजी नगरसेवकांचा यात हात होता. माहिती अधिकाऱ्याच्या नावाखाली खंडणीची वसुली करण्यात येत होती. सुधीर बर्गे हा भाजपचा नेता यात सहभागी होता. खंडणी विरोधी पथक गुन्हे शाखेने याची भांडाफोड केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माहिती अधिकार कायद्याच्या आडून बिल्डरांकडून खंडणी वसुलीचं रॅकेट चालवणाऱ्या मोठ्या टोळीचा पर्दाफाश ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकानं केलाय. याप्रकरणी भाजपचा विद्यमान नेता आणि माजी नगरसेवक सुधीर बर्गे, शौकत मुलानी आणि आरिफ इराकी अशा तिघांना अटक करण्यात आलीय. 


प्रसिद्ध हिरानंदानी बिल्डरकडे बर्गे यानं ५० लाख रूपयांची खंडणी मागितली होती. त्यापैकी ५ लाख रूपयांची वसुली केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. २००७ साली ठाण्याच्या लोकमान्य नगरमधून तो राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आला होता. तर गेल्यावर्षीची पालिका निवडणूक त्याच्या पत्नीनं भाजपच्या तिकिटावर लढवली होती. बर्गे आणि इतरांनी मिळून वेलकम टू ठाणे नावाचा एक ग्रुप तयार केला होता.


ठाण्यातील नामांकित व्यावसायिक आणि बिल्डरकडून ते या माध्यमातून खंडणी मागायचे. त्यांच्याकडे जवळपास १८०० माहिती अधिकार अर्ज सापडले असून, बिल्डर तसंच पालिका अधिकाऱ्यांना ब्लॅकमेल करण्यासाठी ते माहिती अधिकाराचा गैरवापर करायचे, अशी धक्कादायक माहिती पोलीस तपासात पुढं आलीय.